अनिल गौर,पोलीस नायक
अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-
तालुक्यातील सावंगा (आसरा) येथे अमरावती येथिल डॉ.पंजाबराव देशमुख महाविद्यालय रूग्णालय व हनुमान नवयुवक मंडळ व भिमशक्ती युवा क्रिडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सावंगा (आसरा) येथे रविवार दि.६ ऑगस्ट रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात इसीजी,बि.पी,मधुमेह,उच्च रक्तदाब,बालरोग,स्त्री रोग,नेत्ररोग,रक्त तपासण्या करण्यात आल्या.यावेळी १६० व्यक्तींची तपासणी करून मोफत औषधी वितरित करण्यात आली.सदर शिबिर डॉ.सौरभ देशमुख,डॉ.श्रेयश जाधव,डॉ,वैष्णवी निकम,डॉ.प्रिती दुधे,डॉ.पंकज चौधरी,डॉ.स्नेहल पवार,डॉ.प्रेम घाटोळ,डॉ.सुरज देशमुख,निशांत सवाई,अक्षय पाथ्रीकर,हनुमान नवयुवक मंडळ संचालक राम उमेकर,उपाध्यक्ष अजिंक्य उमेकर,भिमशक्ती युवा क्रिडा मंडळ संस्थापक भावेश खेडकर यांच्या मार्गदर्शना खाली पार पडले.याप्रसंगी सुरेश राऊत,राजुभाऊ पेठे,वैभव ठाकरे,विजय उमेकर,संचित गुडघाने,शाम उमेकर,छत्रपती म्हळसणे,गौरव नागपुरे,प्रणल तायवाडे, आशिष तसरे,शैलेश खेडकर,आमिन सौदागर,ओम जोंधळे,धनंजय शिंगणापुरे,आशासेविका अल्फाताई खेडकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.