Just another WordPress site

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी भानुदास देउळकर यांची आत्महत्या

अनिल गौर,पोलीस नायक

अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-

दि.८ ऑगस्ट २३ मंगळवार

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील बेलोरा (धामक) येथील शेतकरी भानुदास देउळकर वय ७५ वर्षे यांनी काल दि.७ रोजी दुपारी घरी कोणीही नसतांना गळफास घेवुन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.याबाबत तळेगाव दशासर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून भानुदास देऊळकर यांच्या निधनाबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील बेलोरा (धामक) येथील शेतकरी भानुदास देउळकर वय ७५ वर्षे यांनी मुलीच्या लग्नाला भारतीय स्टेट बँक बेलोरा (धामक) या शाखेतून सत्तर हजार रुपये कर्ज घेतले होते.त्यात सतत नापिकीमुळे कर्ज भरण्यास  वेळ लागत असल्याने त्यांनी कर्ज रीनीलवल करुन घेतले होते.सदरहू आता कर्जाची रक्कम एक लाख रुपयांच्या जवळपास गेलेली होती त्यामुळे कर्जाची रक्कम भरणे आणखीनच जिकरीचे झाल्यामुळे कर्ज भरण्यासाठी पैसै कुठुन आणणार?असा प्रश्न त्यांना पडला असावा व त्या नैराश्येतूनच भानुदास देऊळकर यांनी काल दि.७ ऑगस्ट सोमवार रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास लहान मुलांच्या पाळण्याची ढोरीला गळफास घेवुन आत्महत्या केली असून त्यांच्या पश्च्यात पत्नी,मुले,सुना,नातवंडे असा परीवार आहे.याबाबत तळेगाव दशासर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक धोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ विजय बगेळ, पो.का प्रफुल्ल वानखडे,पी.सी अंकुश पाटील करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.