Just another WordPress site

मंदिरातील दानपेटी फोडणारा चोरटा अवघ्या १२ तासात पोलिसांच्या जाळ्यात

अनिल गौर,पोलीस नायक

अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-

दि.८ ऑगस्ट २३ मंगळवार

चांदूरबाजार तालुक्यातील ब्राम्हणवाडा थडी येथे दि.५ ऑगस्ट रोजी गंगामाय संस्थान ब्राम्हणवाडा थडी मंदीरातील दानपेटी फोडुन अज्ञात चोरट्याने पैसे चोरून नेल्याची घटना घडली होती.सदरील घटनेचा ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी योग्य दिशेने तपास करून मंदिरातील दानपेटी फोडणारा चोरटा अवघ्या १२ तासात पोलिसांच्या जाळ्यात पकडण्यात यश आले आहे.सदरील कामगिरीबद्दल ब्राम्हणवाडा थडी पोलिसांचे परिसरातून कौतुक केले जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,चांदूरबाजार तालुक्यातील ब्राम्हणवाडा थडी येथे दि.५ ऑगस्ट रोजी गंगामाय संस्थान ब्राम्हणवाडा थडी मंदीरातील दानपेटी फोडुन अज्ञात चोरट्याने पैसे चोरून नेल्याची घटना घडली होती.त्यानुसार आलेल्या तक्रारी वरून पोलीस स्टेशन ब्राम्हणवाडा थडी येथे अप नंबर ३२६/२०२३ भादवी कलम ३७९ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता.सदर चोरी झाल्याची माहीती मिळताच घटनास्थळी जावुन तेथील सी.सी.टी.व्ही पाहणी केली असता तसेच गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहीती वरून आरोपी दीपक सुरेश गवते वय २० वर्ष रा.चिपी पोलीस स्टेशन खंडाळा,ता.तेल्हारा,जि.अकोला याला पकडण्यात पोलिसांना यश आले असून सदर आरोपीला अटक करून त्याचे कडुन गुन्हयातील चोरी केलेली रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.तसेच नमुद गुन्हयाच्या तपासामध्ये आरोपी कडुन हीरो कम्पनीची सुपर स्पेल्डर क्रमांक एम.एच. ३० ए यु.६३२५ तसेच एक ऍनरॉईड जुना वापरता मोबाईल ताब्यात घेण्यात आला असुन आरोपीने सांगीतले की सदरची मोटार सायकल हि त्याचे सासरे सुखचंद कास्देकर रा.बेलमंडळी यांनी चोरी केल्याचे सांगीतले आहे.पुढील तपासात सदर वाहन व मोबाईल चोरीचा आहे किंवा कसे याचा तपास सुरू आहे.सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक अमरावती ग्रामीण अविनाश बारगळ,अपर पोलीस अधिक्षक अमरावती ग्रामीण शशीकांत सातव व उपविभागीय पोलीस अधिकारी अचलपुर अतुल कुमार नवगीरे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक उल्हास राठोड,ठाणेदार पोलीस ठाणे ब्राम्हणवाडा थडी व अंमलदार साहेबराव राजस हेमंत येरखडे,राजु मरस्कोल्हे,चालक शरद जनबंधु यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.