गेल्या ९ वर्षांत या सरकारने काय मिळवले?भाजपाने पाडलेली राज्य सरकार,महागाई ….सुप्रिया सुळेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल
मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत भूमिका मांडत नसल्यामुळे विरोधकांनी त्यासाठी अविश्वास प्रस्ताव आणला. आज या प्रस्तावावर लोकसभेत दोन्ही बाजूंनी आक्रमक चर्चा होताना पाहायला मिळत आहे.काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी लोकसभेत या प्रस्तावावर भाषण केल्यानंतर त्यावरून सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या बाकांवरून आक्रमकपणे भूमिका मांडण्यात आली.राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना परखड शब्दांत सवाल केले तसेच देशाच्या आर्थिक परिस्थितीवरही टीका केली असून आम्ही भारतीय नागरिकांचे प्रतिनिधी आहोत त्यामुळे नागरिकांच्या भावना इथे मांडण्यासाठी आम्ही हा अविश्वास प्रस्ताव आणला असे सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.यांना फार हौस आहे नवरत्न वगैरे बोलण्याचा.गेल्या ९ वर्षांत या सरकारने काय मिळवले. भाजपाने पाडलेली राज्य सरकार,महागाई,घरगुती गॅसचे वाढलेले दर,सरकारी संस्थांच पतन,भारताचे जागतिक स्तरावर घसरलेले मानांकन आणि कायदा-व्यवस्थेचा मुद्दा अशा शब्दांत सुप्रिया सुळेंनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.तसेच गेल्या ९ वर्षांत भाजपाने ९ सरकार पाडली आहेत यात अरुणाचल,उत्तराखंड,मणिपूर,मेघालय,कर्नाटक,गोवा,मध्य प्रदेश,पुदुच्चेरी आणि महाराष्ट्र सरकार दोन वेळा यांचा समावेश असल्याने त्यांनी नमूद केले.
त्याचबरोबर १८.२ लाख कोटींचे एनपीए जर सरकार माफ करत असेल तर शेतकऱ्यांचे कर्जही माफ करून टाका.हे १८.२ लाख कोटी कुणाचे माफ केले कुणास ठाऊक यात शून्य तरी किती येतात हेही मला माहीत नाही एवढे गणित मला तरी येत नाही असा टोला सुप्रिया सुळेंनी यावेळी नरेंद्र मोदी सरकारला लगावला.दरम्यान मणिपूरच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळेंनी सरकारवर टीकास्र सोडतांना म्हटले की, मणिपूरमध्ये लाजिरवाण्या चुका तिथल्या राज्य सरकारकडून झाल्या आहेत यानंतर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायलाच हवा.येथे १७९ मृत्यू, ६० हजार लोक बेघर झाले,३५० रिलीफ कॅम्प,कॅम्पमध्ये निर्वासित ४० हजार,३६६२ घरे जाळली,३२१ प्रार्थनास्थळ जाळली,१६१ केंद्रीय दल तैनात करण्यात आली,१० हजारहून जास्त दंगली,हत्या,बलात्काराची प्रकरण घडली आहेत.आपण इतके असंवेदनशील झालो आहोत का?” असा परखड सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला.तुम्ही अशा सरकारला पाठिंबा कसा देऊ शकता हे सत्ताधारी आणि विरोधकांबद्दल नसून हे या देशाच्या महिलांच्या सन्मानाबद्दल आहे तिच्या चारित्र्याचे धिंडवडे काढाल? असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.