Just another WordPress site

“मला घरातून फरफटत नेऊन १४ दिवस तुरुंगात टाकले…..”

लोकसभेतील नरेंद्र मोदी सरकारविरोधातील अविश्वास ठरावावरून नवनीत राणा आक्रमक

दि.९ ऑगस्ट २३ बुधवार

कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन घोषित केला होता त्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानासमोर हनुमान चालीसा वाचण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अमरावतीच्या खासदार नवणीत राणा यांना अटक करण्यात आली होती तसेच तुरुंगात असतांना आपल्याला चुकीची वागणूक दिली गेली असे नवनीत राणा यांनी अनेकदा सांगितले आहे.या अटक प्रकरणावरून नवनीत राणा सातत्याने तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारवर टीका करत असतात.नवनीत राणा यांनी काल दि. ८ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा या प्रकरणावरून उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करून त्यांनी थेट लोकसभेच्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला.मणिपूरधील हिंसाचार आणि तिथली परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्यामुळे लोकसभेत आज नरेंद्र मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला होता यावर वेगवेगळ्या पक्षांचे खासदार,अपक्ष खासदार आपल्या भूमिका मांडत होते तेव्हा लोकसभा अध्यक्षांनी खासदार नवनीन राणा यांनाही बोलण्याची परवानगी दिली तेव्हा नवनीन राणा म्हणाल्या,विरोधी पक्षांचे लोक मणिपूरमधील महिलांवरील अत्याचाराबद्दल बोलत आहेत परंतु हेच लोक राजस्थान आणि महाराष्ट्रात झालेल्या महिलांवरील अन्यायावर काहीच बोलले नाहीत.

नवनीत राणा म्हणाल्या,खासदार श्रीकांत शिंदे यांनी आत्ता लोकसभेत हनुमान चालीसा पठण केली ते करत असतांना मला भिती वाटली नाही कारण देशात मोदी सरकार आहे परंतु आमच्या महाराष्ट्रात मी फक्त घोषणा केली होती की मी हनुमान चालीसा पठण करेन त्यानंतर मला घरातून फरफटत नेऊन तुरुंगात टाकले मला १४ दिवस तुरुंगात आणि दोन दिवस कोठडीत ठेवले परंतु इथे नरेंद्र मोदी यांचे राज्य आहे या लोकसभेत असा अत्याचार कोणी कोणावर करणार नाही.खासदार राणा म्हणाल्या,महाराष्ट्रात एसटी महामंडळाच्या महिला त्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर आंदोलन करत होत्या तेव्हा त्या महिलांना उचलून तुरुंगात डांबले एक महिना तिथेच ठेवले तेव्हा हा विरोधी पक्ष का गप्प बसला होता? मणिपूरमधील महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा घेऊन ते बोलत आहेत परंतु त्यांना तिथल्या महिंलांबद्दल आस्था नाही त्यांना केवळ नरेंद्र मोदी यांचा विरोध करायचा आहे असेही नवनीत राणा यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.