जळगाव-पोलीस नायक(जिल्हा प्रतिनिधी):-
राज्यातील २८ जिल्हा परिषदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.या आरक्षण सोडतीमुळे आता लवकर निवडणुका होतील अशी आशा निर्माण झाली आहे.राज्यातील केवळ ९ ठिकाणी खुल्या गटासाठी आरक्षण पडल्याने इच्छुकांच्या पदरी निराशाच पडली आहे.तर ११ ठिकाणी महिलासाठी राखीव प्रवर्ग राहिला आहे.आता पुढील अध्यादेश कधी निघणार याकडे झेडीपी,पंचायत समितीच्या इच्छुकांच्या नजरा लागल्या आहेत.जळगाव जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गाकरिता राखीव झाले आहे.राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करत अनेकांना धक्का दिला आहे.यामध्ये जळगाव जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गाकरिता राखीव झाल्याने यातही मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.राज्यात केवळ रत्नागिरी आणि सातारा येथेच ओबीसी महिला आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
राज्यातील जिल्हा परिषद व (कंसात) पुढीलप्रमाणे- सर्वसाधरण प्रवर्ग – ठाणे,रायगड,सिंधुदुर्ग,जळगांव,पुणे,औरंगाबाद,वाशिम,बुलढाणा,यवतमाळ.अनुसूचित जमाती प्रवर्ग पालघर,अहमदनगर,बीड,परभणी,नागपूर,नागरीकांचा मागास प्रवर्ग (महिला) –रत्नागिरी, सातारा.सर्वसाधारण (महिला) –नाशिक, धुळे, सांगली,कोल्हापूर,हिंगोली,उस्मानाबाद,लातूर,अमरावती,अकोला.नागरिकांचा मागास प्रवर्ग –सोलापूर,जालना,नांदेड.अशा प्रकारे राज्यातील २८ जिल्हापरिषदांचे आरक्षण जाहीर करण्यात आलेले आहे.