Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१२ ऑगस्ट २३ शनिवार
राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आमदार नवाब मलिक यांना अखेर दिलासा मिळाला असून सर्वोच्च न्यायालयाने प्रकृतीच्या कारणास्तव नवाब मलिक यांना जामीन मंजूर केला आहे.सदरील जमीन हा दोन महिन्यांसाठी असणार आहे.नवाब मलिक यांच्या वैद्यकीय कारणासाठी उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली होती पण १३ जुलैला उच्च न्यायालयाने मलिक यांचा जामिन अर्ज फेटाळला होता त्यामुळे मलिकांना धक्का बसला होता त्यामुळे नवाब मलिकांना आणखी किती दिवस तुरुंगात काढावे लागणार? अशा चर्चा रंगल्या होत्या पण अखेर मलिकांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
अंडरवर्ल्डशी असलेले कथित प्रकरण आणि मनी लाँण्ड्रिंग प्रकरणात २३ फेब्रवारी २०२२ रोजी अटक करण्यात आली होती पण किडनी संबंधित असलेल्या दुर्धर आजाराशी मलिक यांना ग्रासले होते.दरम्यान मलिक किडनी आजाराशी ग्रासलेले असून त्यांना जामीन देण्याची मागणी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केली यावर ईडीकडून महाधिवक्ता तुषार मेहता यांनीही विरोध दर्शवला नाही त्यामुळे नवाब मलिक यांचा अखेर जमीन मंजूर करून सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.