केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ९ ऑगस्ट बुधवार रोजी मारेगाव तालुक्यातील कलावती बांदूरकर या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलेला घर,वीज,शौचालय,आरोग्य या सुविधा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या असे ठामपणे सांगून राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला होता या प्रकारानंतर कलावती बांदूरकर यांनी अमित शहा यांचा दावा खोडून काढत आपल्याला राहुल गांधी यांच्यामुळेच सर्व मदत मिळाल्याचे सांगत केंद्र सरकारला खोटे ठरवले होते याप्रकरणावर आमदार बच्चू कडू यांनी भाष्य केले असून अमित शाहांसारख्या मोठ्या नेत्यांनी विचारपूर्वक वक्तव्य करण्याची गरज आहे यामुळे भाजपा पक्ष अडचणीत येतो असे बच्चू कडू यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलतांना म्हटले आहे.
पहिल्यांदा राहुल गांधींनी मुर्खपणा केला.कलावती यांना घर बांधून देणे ही विटंबना होती.सामान्य लोकांचा छळ करण्यासारखे ते होते तुमचे सरकार असतांना धोरण आखले पाहिजे होते फक्त कलावती यांच्या घरी जाऊन वीज,घर द्यायचे हे तर डिवचण्यासारखी पद्धत होती.करोडो लोक रांगेत उभी असतांना एखाद्यासाठी उदार व्हायचे आणि बाकीच्यांच्या हाती भोपळा द्यायचा अशी संतप्त प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी व्यक्त केली.आता त्यापेक्षा मोठा मुर्खपणा अमित शाहांनी संसदेत केला.अमित शाहांनी संसदेत कलावती यांना वीज,घर दिल्याचे सांगितले पण ‘जे काही दिले ते काँग्रेसने दिले ’ असे कलवती यांनी म्हटले आहे.एवढ्या मोठ्या नेत्यांनी खोटे बोलतांना थोडा विचार करण्याची गरज होती त्यामुळे भाजपा पक्षाच्या अडचणीत वाढ होते.प्रत्येक गोष्टीत हे खोटे बोलतात असा प्रचार झाला आहे.विरोधकांना नवीन संधी अमित शाहांनी दिली आहे असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.