“पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला धोकादायक असून त्यांना समर्थन देणाऱ्या हिंदू संघटनांनी फेरविचार केला पाहिजे”-प्रकाश आंबेडकर यांचे वक्तव्य
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१२ ऑगस्ट २३ शनिवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला धोकादायक झाले आहेत त्यांना समर्थन देणाऱ्या हिंदू संघटनांनी फेरविचार केला पाहिजे असे वक्तव्य बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.मोदींनी मणिपूरमध्ये मैतेई जातीला आदिवासींचा दर्जा का दिला? तशी मागणी होती का? हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केले पाहिजे असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे तसेच आगामी लोकसभा निवडणुका आपण अकोल्यातूनच लढणार आहोत असेही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.प्रकाश आंबेडकर यांनी भाजपाविरोधातल्या इंडिया या आघाडीच्या विरोधात वक्तव्य केले असून या आघाडीत एसटी,एससी,ओबीसी नाहीत.माझ्यासारखे भाजपाच्या विरोधात असणारे तुम्ही का घेत नाही? असाही प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी विचारला आहे.मुंबईत भाजपा विरोधी पक्षांची बैठक होणार आहे.या बैठकीचे कुठलही निमंत्रण मला देण्यात आलेले नाही.मुंबईतल्या बैठकीच्या निमंत्रणाची मी वाट पाहतो आहे असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत प्रकाश आंबेडकर यांनी हे वक्तव्य केले आहे.
दरम्यान माझे माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्याशी घरगुती संबंध होते व अशोक चव्हाण यांच्याशीही माझे घरगुती संबंध आहेत त्यांच्याशी माझा राजकारणापलिकडचा संवादा आहे असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.महाविकास आघाडीत माझा समावेश करण्याची जबाबदारी उद्धव ठाकरेंनी घेतली आहे.उद्धव ठाकरे हे शब्दाचे पक्के आहेत.उद्धव ठाकरे हे कमी बोलतात पण ठोस बोलतात असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.औरंगजेबाच्या मजारीविषयी प्रकाश आंबेडकर यांनी वक्तव्य केले असून आम्हाला दंगल थांबवायची होती म्हणून आम्ही तिथे गेलो होतो असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.