Just another WordPress site

सांगलीतील निर्धार फौंडेशनतर्फे शहरातील सार्वजनिक ठिकाणांची सलग ७६ तास स्वच्छता मोहीम

सांगली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.१४ ऑगस्ट २३ सोमवार

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सांगलीतील निर्धार फौंडेशनच्या तरूणांनी शहरातील सार्वजनिक ठिकाणांची सलग ७६ तास स्वच्छता मोहीम सुरू केली आहे.दरम्यान सलगपणे तीन दिवस व तीन रात्री चालणार्‍या या स्वच्छता मोहिमेला सांगलीतील हुतात्मा स्मारकापासून सुरूवात करण्यात आली आहे.बसस्थानक,पोलीस ठाणे,रस्त्यावरील दुभाजके,महापुरूषांचे पुतळे आदींची या मोहिमेमध्ये स्वच्छता व रंगरंगोटी करण्यात येत आहे.स्वच्छतेचा नारा देत गेली १ हजार ९२९ दिवस अव्याहतपणे काम करणार्‍या निर्धार फौंडेशनचे अध्यक्ष राकेश दड्डणावर आणि त्यांच्या सहकार्‍यांकडून ही मोहिम हाती घेण्यात आली आहे.हुतात्मा स्मारक येथे महापालिकेचे उपायुक्त राहूल रोकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत या मोेहिमेचा शनिवारी शुभारंभ करण्यात आला.

सार्वजनिक ठिकाणी जमलेला पालापाचोळा,अनावश्यक वाढलेले गवत-झाडेझुडपे,प्लास्टिक आदि गोळा करून स्वच्छता करण्यात येत आहे.दुपारी विश्रामबाग पोलिस ठाण्यात स्वच्छता अभियान करून सिमेंटची आसने,कठडे व दर्शनी भिंत आकर्षक रंगसंगतीने रंगविण्यात आली तर रात्री जिल्हा परिषद समोरील रस्ता दुभाजकालगतची माती व तण काढण्यात आले.या उपक्रमाबाबत दड्डणावर म्हणाले की, शहरातील विविध ठिकाणी सलग ७६ तास स्वच्छता राबवित १५ ऑगस्ट सकाळी १० वा शहीद अशोक कामटे चौक येथे या अभियानाची सांगता होणार आहे.तरी सर्व स्वच्छता प्रेमी नागरिकांचे या उपक्रमात सहभागी होऊन शहर स्वच्छतेच्या उपक्रमात सहभाग नोंदवावा.या उपक्रमामध्ये अनिल अंकलखोपे,भरतकुमार पाटील,वसंत भोसले,गणेश चलवादे,मनोज नाटेकर,रफिक मोमीन,रोहीत कोळी,मानस साहु, अनिरुद्ध कुंभार आदी युवक सहभागी झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.