Just another WordPress site

“जर संकल्प पूर्ण करायचा असेल तर आपल्याला तीन वाईट प्रवृत्तींचा सामना करणे गरजेचे”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लाल किल्ल्यावरून देशवासियांना आवाहन

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१५ ऑगस्ट २३ मंगळवार

देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिल्लीतील लाल किल्ल्यावर सोहळ्याचे आयोजन करण्यात आले प्रसंगी  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी आपल्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या विकासाबाबत बोलतांनाच विरोधकांवरही टीका केली.आधीच्या सरकारच्या काळात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर झाल्याची टीका मोदींनी यावेळी केली तसेच देशाच्या विकासामध्ये तीन वाईट प्रवृत्ती असल्याचे सांगतांना त्यात घराणेशाहीचा उल्लेख करत मोदींनी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांना टोला लगावला.२०४७ मध्ये जेव्हा देश स्वातंत्र्याची १०० वर्षं साजरी करत असेल तेव्हा भारत विकसित झाला असेल हे मी देशाच्या सामर्थ्याच्या जोरावर म्हणतोय.सर्वात जास्त ३० हून कमी वयाच्या युवा शक्तीच्या जोरावर,महिलांच्या जोरावर म्हणत आहे पण त्यामध्ये काही अडथळे आहेत.काही विकृती गेल्या ७५ वर्षांत देशात घर करून बसल्या आहेत.आपल्या समाजव्यवस्थेचा असा हिस्सा बनल्या आहेत की कधीकधी आपण डोळे बंद करून घेतो पण आता डोळे बंद करण्याचा वेळ नाहीये जर संकल्प पूर्ण करायचा असेल तर आपल्याला तीन वाईट प्रवृत्तींचा सामना करणे गरजेचे आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.या तीन वाईट प्रवृत्तींपैकी पहिली प्रवृत्ती म्हणजे भ्रष्टाचार असल्याचे मोदी यावेळी म्हणाले.आपल्या देशाच्या सर्व समस्यांच्या मुळाशी भ्रष्टाचाराने वाळवीप्रमाणे देशाच्या सामर्थ्याला पोखरून काढले  आहे.भ्रष्टाचारापासून मुक्ती,त्याच्याविरोधात लढा प्रत्येक क्षेत्रात होणे आवश्यक आहे हा मोदींचा शब्द आहे.मी भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत राहीन असे ते म्हणाले.दुसरी अडचण म्हणजे आपल्या देशाला घराणेशाहीने पोखरून ठेवले आहे.घराणेशाहीने देशाला बांधून ठेवले आहे त्यामुळे देशाच्या लोकांचे अधिकार हिसकावून घेतले आहेत असे ते म्हणाले.तसेच तिसरी अडचण म्हणजे द्वेषभावना.या द्वेषभावनेने देशाच्या मूलभूत विचाराला,देशाच्या सर्वसमावेशच चारित्र्याला डाग लावला आहे.उद्ध्वस्त करून ठेवले आहे अशा शब्दांत मोदींनी देशासमोरची तिसरी वाईट प्रवृत्ती नमूद केली.

आपल्याला या तीन वाईट प्रवृत्तींविरोधात पूर्ण सामर्थ्यानिशी लढायचे आहे.भ्रष्टाचार,घराणेशाही,तुष्टीकरण ही आव्हाने आपल्यासमोर आहेत या गोष्टी आपल्या देशाच्या लोकांमधल्या आकांक्षा दाबून टाकतात.लोकांचे शोषण करतात.आपले गरीब,दलित,मागास,पसमांदा,आदिवासी, महिला आपण सगळ्यांनी त्यांच्या हक्कांसाठी या तीन वाईट प्रवृत्तींशी मुक्ती मिळवायला हवी.आपल्याला भ्रष्टाचाराच्या विरोधात संतापाचे  वातावरण बनवायला हवे असे मोदी म्हणाले.तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सरकार भ्रष्टाचारापासून मुक्ततेसाठी प्रयत्न करत आहे.गेल्या ९ वर्षांत जे १० कोटी लोक व्यवस्थेचा गैरफायदा घेत होते ते मी बंद करून टाकले हे १० कोटी लोक असे होते ज्यांचा जन्मच झाला नव्हता हे लोक मोठे व्हायचे,म्हातारे व्हायचे,दिव्यांग व्हायचे हे सगळे मी बंद केले आहे अशी माहिती यावेळी मोदींनी दिली.दरम्यान यावेळी बोलतांना मोदींनी घराणेशाहीवर टीका केली.आज देशाच्या लोकशाहीत एक अशी विकृती आहे जी कधीच भारताच्या लोकशाहीला मजबुती देऊ शकत नाही. ती म्हणजे घराणेशाहीवादी पक्ष त्यांचा मूलमंत्र आहे पार्टी ऑफ द फॅमिली,बाय द फॅमिली अँड फॉर द फॅमिली.त्यांचा जीवनमंत्रच हा आहे की त्यांचा राजकीय पक्ष कुटुंबाचा,कुटुंबाकडून व कुटुंबासाठी चालावा.घराणेशाही प्रतिभेची शत्रू असते त्यामुळे घराणेशाहीचे उच्चाटन देशाच्या लोकशाहीच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.