Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१५ ऑगस्ट २३ मंगळवार
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात ध्वजावंदन करून भारतीय जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याचाही गौरव केला.अमृत कालातील स्वातंत्र्यदिनाच्या जगभरातील भारतीयांना आणि महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना या ठिकाणी शुभेच्छा देतो.आपला स्वातंत्र्यदिन,आपला तिरंगा झेंडा,निशाणी जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत सन्मानाने डौलत राहील अशी प्रार्थना करतो असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हणाले तसेच जनतेला संबोधित केलेल्या भाषणातही त्यांनी हा उल्लेख केला होता.
या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मोदींनी दिल्लीमध्ये ५०० विशेष पाहुणे बोलावले आहेत ज्यामध्ये शेतकरी,शेतकरी उत्पादक कंपन्यांचे लोक, सामान्य कामगार,सफाई कर्मचारी,बांधकाम कामगार,देशाच्या स्वातंत्र्याचे महत्त्व साजरा करतांना देशातील प्रत्येक घटकाला सोबत घेण्याचे काम मोदींनी केले आहे.हर घर तिरंगा मोहिम राबवली आहे.मेरी माती मेरा देश या अभियानांतर्गत देशाप्रती आणि मातीप्रती सन्मानाची भावना तयार होत आहे.मोदीजी यांच्या नेतृत्वात देश आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील शेवटच्या माणसाची स्वप्ने पूर्ण करत विकासासकडे जातील असा विश्वासही त्यांनी यानिमित्ताने व्यक्त केला.गडचिरोली पोलिसांना शौर्य पदके मिळाले आहे याबाबत बोलतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की,अतिशय समाधान आहे की आमच्या गडचिरोलीच्या पोलिसांनी जे शौर्य दाखवले त्यामुळे मोठ्या प्रमाणात पदके मिळाली.२६ जानेवारीलाही पदक मिळाले होते वर्षभरात ६४ पदके गडचिरोलीला मिळाली आहेत.देशभरातील सर्वाधिक पदके गडचिरोलीला मिळाली आहेत.गडचिरोलीत शांतता प्रस्थापित करण्याकरता ही पदके मिळाली आहेत अजूनही संघर्ष संपलेला नाही. अटकलेला एक जरी व्यक्ती शिल्लक असले तर त्याला मुख्य धारेत आणावे लागेल त्यासाठी पोलिसांना अहोरात्र सजग राहावे लागेल. देशविघातक शक्ती माओवाद्यांमध्ये पोहोचलेले झाले आहेत यात गडचिरोली आणि महाराष्ट्र पोलीस सजग राहतील असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले आहे.