सादिक शेख,पोलीस नायक
मोताळा तालुका (प्रतिनिधी) :-
दि.१८ ऑगस्ट २३ शुक्रवार
तालुक्यातील धामणगाव बढे येथील डॉ.झाकीर हुसेन उर्दू माध्यमिक शाळेचा विद्यार्थी शेख नावेद शेख अकील याची जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत नुकतीच निवड करण्यात आली आहे.शेख नावेद याच्या निवडीबद्दल संस्थेचे सहसचिव ऍड.वसीम कुरेशी यांच्याकडून त्याचा नुकताच सत्कार करण्यात आला.
मोताळा येथे तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धा नुकतीच आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत तालुक्यातील सर्व शाळांनी सहभाग नोंदविला होता.यात १४ वर्षापेक्षा कमी वयोगटात धामणगाव बढे येथील डॉ.झाकीर हुसेन उर्दू हायस्कुलचा इयत्ता ८ विचा विद्यार्थ्यां शेख नावेद शेख अकिल सहभाग नोंदविला होता.या स्पर्धेत नावेद याने दैदिप्यमान कामगिरी बजावित तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत यश संपादन केले असल्यामुळे त्याची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेकरिता निवड करण्यात आली आहे.सदरील निवडीबद्दल शेख नावेद या विद्यार्थ्यांचे १५ ऑगस्ट रोजी सोशल वेलफेअर उर्दू एज्युकेशन सोसायटीच्या वतीने सहसचिव ऍड.वसीम कुरेशी यांनी शाल व पेन देऊन सत्कार करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या आहेत.यावेळी मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.शेख नावेद याच्या निवडीबद्दल सर्व थरातून त्याचे कौतुक केले जात आहे.