अंजनगाव सुर्जी येथे राष्ट्रीय ध्वज सन्माना प्रित्यार्थ महात्मा फुले यांच्या पुतळ्याचे पूजन व मिठाई वाटप
अनिल गौर,पोलीस नायक
अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.१८ ऑगस्ट २३ शुक्रवार
जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील सुर्जी परिसरातील महात्मा फुले मार्केट बुधवारा येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त नेताजी स्पोर्टिंग क्लबच्या वतीने महात्मा फुले मार्केट मधील राष्ट्रीय ध्वजाचे सन्मान करण्यात आला तसेच महात्मा फुलेंच्याच्या पुतळ्याला तिलक हार अर्पण करून पूजन करण्यात आले.सदरील कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडला असून परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादमिळाला.
प्रसंगी नेताजी स्पोर्टिंग क्लबच्या कार्यकर्त्यांच्या वतीने लहान मुलांना झेंड्यांचे वाटप करण्यात आले तसेच परिसरातील नागरिकांना मिठाईचे वाटप करण्यात आले.यावेळी अनिलभाऊ लुटे,नितीन निंबोकार,पत्रकार अनिल गौर,विनायक लोळे,सचिन लुटे,शेख अनिस,उमेश जुमळे, निलेश मंडवे,सुनील गौर,शुभम कहार,गजाननभाऊ खंगार,गणेश शाहू,शंकर गुप्ता,विलासभाऊ धोटकर,सतीश जुमळे,सुनिल लुटे,रोशन मंडवे,रामा गौर,पप्पु मंडवे व सर्व नेताजी स्पोर्टिंग क्लबचे कार्यकर्ते यांच्यासह परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.