Just another WordPress site

पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्या हल्लेखोरांवर कार्यवाही करण्याची मागणी

पॉवर ऑफ मीडियाचे तहसीलदारांना निवेदन सादर

अनिल गौर,पोलीस नायक
अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-

दि.१९ ऑगस्ट २३ शनिवार

नांदगाव खंडेश्वर पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांचेवर काही गुंडांनी हल्ला करून त्यांना जखमी केले आहे आणि हा हल्ला तेथील स्थानिक आमदार किशोर पाटील यांच्या सांगण्यावरून करण्यात आलेला आहे.सदरील हल्ला हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला असून हा अन्याय आम्ही कदापिही सहन करणार नाही आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करतो तसेच पत्रकार संदीप महाजन यांचेवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करून त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी पॉवर ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या वतीने नुकत्याच दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.

तसेच ज्यांच्या सांगण्यावरून हा हल्ला करण्यात आला ते स्थानिक आमदार किशोर पाटील यांचेवर सुद्धा गुन्हे दाखल करून त्यांना अपात्र ठरविण्यात यावे अन्यथा पॉवर ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या वतीने राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा राज्याचे गृहमत्री ना.देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनात देण्यात आला असून हे निवेदन नांदगाव खंडेश्वर येथील निवासी तहसीलदार बबन राठोड यांचेमार्फत पाठविण्यात आले आहे.सदर निवेदन पॉवर ऑफ मीडियाचे अमरावती विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राम्हणवाडे यांचे नेतृत्वात तालुका अध्यक्ष श्रीपाल सहारे,सचिव पवन ठाकरे,निकेत ठाकरे,प्रशांत झोपाटे,अरुण बनकर,सागर गावनेर,अनिकेत शिरभाते,गजानन भस्मे,नितेश कानबाले, सूरज सहारे,संदेश ढोके,योगेश राऊत,अंकुश निमनेकर,प्रदीप रघुते यांचे उपस्थितीत देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.