अनिल गौर,पोलीस नायक
अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.१९ ऑगस्ट २३ शनिवार
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.बबनरावजी तायवाडे यांच्या सूचनेनुसार तसेच मार्गदर्शनात अमरावती जिल्हाध्यक्ष अनिल ठाकरे यांनी काल दि.१८ ऑगस्ट शुक्रवार रोजी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अंजनगाव सुर्जी तालुका अध्यक्षपदी सागर साबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सागर साबळे यांच्या आजपर्यंतच्या सामाजिक कार्याची दखल घेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाला भविष्यात त्यांच्या कार्याचा नक्कीच फायदा होईल तसेच या उद्दिष्टाने अंजनगाव सुर्जी तालुक्यात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्य वाढवण्याकरिता नियुक्ती केल्याचे जिल्हाध्यक्ष अनिल ठाकरे यांनी म्हटले आहे.