यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१९ ऑगस्ट २३ शनिवार
तालुक्यातील किनगाव येथे कल्पतरू सेवा फाऊंडेशन व दि.पीपल्स बँक आँफ जळगाव संचलित राजेश्री छत्रपती शाहु महाराज हाँस्पीटल जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने काल दि.१८ ऑगस्ट शुक्रवार रोजी किनगाव येथील श्रीराम मंदीराच्या आवारात मोफत हृदय रोग तपासणी शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न झाले.सदरील शिबिरात रुग्णांनी उत्फूर्त प्रतिसाद नोंदविला.
कल्पतरू सेवा फाऊंडेशन व दि.पीपल्स बँक आँफ जळगाव संचलित राजेश्री छत्रपती शाहु महाराज हाँस्पीटल जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या या मोफत हृद्दय रोग तपासणी शिबीरात परिसरातील रूग्णांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याने या शिबिरात सुमारे १५० रूग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली.यावेळी रूग्णांचे इ.सी.जी.करून हृदयरोगावर शिबिरात सहभागी रुग्णांना मार्गदर्शन करण्यात आले.या शिबीरात जळगाव येथील जिल्हा सरकारी रुग्णालयातील डॉ.अजित गुप्ता,एम.सी.ओ.प्रतीक सोनार व त्यांचे सहकारी यांचे रूग्णांच्या आरोग्य तपासणीसाठी विशेष योगदान लाभले.या शिबीराच्या यशस्वीतेसाठी कल्पतरू सेवा फाऊंडेशनचे अनिल पाटील,योगेश पाटील,हर्ष पाटील,अस्लम पटेल,जितू पाटील,योगेश पाटील,श्रीराम धनगर,उमेश पाटील,दीपक चव्हाण,पांडुरंग तेली,स्वप्नील महाजन,विजय पतांगपुरे प्रफुल्ल पाटील यांच्यासह कल्पतरू सेवा फाऊंडेशन जळगाव च्या संस्थेचे सर्व स्वयंसेवकांचे व वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ डॉक्टरांचे सहकार्य लाभले.