Just another WordPress site

यावल येथे स्वातंत्र्यदिनानिमित्ताने नागरिकांना विविध वृक्षांचे वाटप

यावल-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.१९ ऑगस्ट २३ शनिवार

येथील सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्था व पर्यावरण गृपतर्फे ७६ व्या स्वातंत्रदिनाचे औचित्य साधुन वृक्ष संवर्धनासाठी रोप वाटपाचा कार्यक्रम नुकताच राबविण्यात आला.

सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय या सामाजिक संस्थेच्या वतीने अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जातात.त्याचाच भाग म्हणून यंदा सुद्धा १५ ऑगस्ट रोजी ७७ व्या अमृत महोत्सवा निमित्ताने येथील शहरातील आठवडे बाजार परिसरातील चौकामध्ये सखी श्रावणी महिला बहुउद्देशिय संस्थाध्यक्षा राजश्री नेवे यांचे नेतृत्वात विविध आयुर्वेदिक,डेरेदार सावली देणारे तसेच ऑक्सिजन देणाऱ्या अश्या विविध ५०० रोपांचे जे नागरिक वृक्ष लागवडीच्या माध्यमातुन वृक्षांचे वृक्षसंवर्धन करतील त्यांनाच रोपांचे वाटप करण्यात आले.यासाठी नाना पाटिल,सुर्यकांत पाटील,समाजसेवक जाकिर पटेल यांचेसह हाॅकर्स झोन संघटना यांचे अनमोल सहकार्य लाभले.यावेळी संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नेवे,कामिनी नेवे,संगिता भामरे,माया चौधरी,वंदना झांबरे,स्मिता माहूरकर,राजश्री सुरवाडे यांच्यासह सदस्या व नागरिक उपस्थीत होते.कार्यक्रम यशस्वीतेकरीता उमेश नेवे,सैय्यद मुश्ताक,रफीक देशमुख,जावेद खान,हारुन शेख यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.