बारब्दे महाविद्यालयातील ध्वजारोहण दहावी बारावीमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्याचा सरपंचांनी घेतला निर्णय
अनिल गौर,पोलीस नायक
अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.२० ऑगस्ट २३ रविवार
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील चिंचोली बुद्रुक येथील सरपंच सागर खंडारे यांनी १५ ऑगस्ट स्वतंत्र अमृत महोत्सव यानिमित्त कौसल्याबाई बारब्दे कनिष्ठ महाविद्यालय येथील १० वी किवा १२ वी मधून सर्वात ज्यास्त गुण मिळून प्रथम क्रमांक येईल अश्या विद्यार्थि किंवा विद्यार्थ्यांनी यांच्या मार्फत ग्रामपंचायतमध्ये झेंडा पूजन व झेंडा वंदन करण्याचा सन्मान देण्यात येईल असा निर्णय येथील लोकप्रिय सरपंच सागर खंडारे यांनी घेतला आहे.सागर खंडारे हे या विद्यालयाचे माजी विद्यार्थी असल्याने विद्यालयाविषयी खूप तळमळ असल्याचे यातून पहायला मिळत आहे.
यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमप्रसंगी सरपंच सागर खंडारे म्हणाले कि,मला विद्यालयात चांगले शिक्षण मिळाले असून माझ्याकडून आपल्या विद्यालयाला जे काही सहकार्य होईल ते मी निश्चितच करेल तसेच विद्यार्थी प्रथम आल्यास झेंडावंदन करण्याची संधी सदरील विद्यार्थ्याला मिळेल म्हणून विद्यार्थी मोठया संख्येने अभ्यास करून प्रथम येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील आणि त्याच बरोबर विद्यालयाचे व गावाचे नाव रोशन करण्यास मदत होईल खरेतर प्रत्येक गावातील सरपंच यांनी असा संकल्प घेण्याची गरज असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले.चिंचोली बु. येथील सरपंच सागर खंडारे यांनी घेतलेल्या या निर्णयाचे गावकरी व विद्यालयाच्या वतीने तसेच सर्व थरातून कौतुक केले जात आहे.