यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२० ऑगस्ट २३ रविवार
तालुक्यातील डोंगर कठोरा येथील शेतकरी लक्ष्मण (लपा)बुधो पाटील यांच्या मातोश्री गं.भा कमलाबाई बुधो पाटील यांचे आज दि.२०ऑगस्ट २३ रोजी सकाळी १.२० वाजता वृद्धपकाळामुळे दुःखद निधन झाले.त्यांच्या निधनामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांची अंतयात्रा आज २० ऑगस्ट रविवार रोजी डोंगर कठोरा येथील त्यांच्या राहत्या घरून सकाळी १०.३० वाजता काढण्यात आली.त्यांच्या अंतयात्रेत सर्वच थरातील मान्यवर ,नातेवाईक व मित्रमंडळी गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.त्यांच्या पश्चात दोन मुले,तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे.