अनिल गौर,पोलीस नायक
अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.२२ ऑगस्ट २३ मंगळवार
अमरावती जिल्ह्यात सरासरी पावसाचे प्रमाण कमी असून अशातच अंजनगाव सुर्जी व दर्यापूर तालुक्यातील नागरिकांचे तहान भागवणारे संजीवनी अचलपूर तालुका व अंजनगाव सुर्जीच्या मध्यभागी असलेले शाहनूर धरण अद्यापही जलसाठ्याने पूर्ण भरलेले नाही परिणामी या धरणात आज ६१ टक्के घन सेंटीमीटर जलसाठा असल्याची माहिती मिळाली आहे.
शाहनूर धरणामध्ये मेळघाटच्या उंच दऱ्या खोऱ्यातून बहुतांशी नद्या या खोगडा,गिरगुठी,जामली आर चिचखेडा, टेब्रुनसोडा, धरमडोह,पिपाधरी, सती,सोनापूर,तेलखार अशा डोंगराळ भागातून नदी नाले मोठ्या प्रचंड वेगाने वाहत असतात परंतु यावर्षी धरण क्षेत्रातील पर्वतरांगावर सरासरी पेक्षा कमी पाऊस असल्याने ऑगस्ट महिन्यामध्ये हे धरण चौरमल,आकी व मोरघड या क्षेत्रापर्यंत ६१ टक्केच पाणी असल्याने भविष्यात पाणी प्रश्न भेडसावणार असल्याचे चित्र आताच निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.यावर्षी पाहिजे तसा पावसाळा झालेला नसल्यामुळे एकही मोठा पूर शहाणूर नदीला आलेला नाही त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या विहिरी व बोरवेलला सुद्धा पाणीसाठा कमी झाला असल्याचे बोलल्या जात आहे. दर्यापूर तसेच अंजनगाव सुर्जी तालुक्यातील तहान भागविणारे धरणात अद्यापही पूर्ण जलसाठा उपलब्ध होऊ शकला नसल्याने नागरिकांनी सुद्धा पिण्याच्या पाण्याचा सांभाळून वापर करावा अशाही चर्चा नागरिकांमध्ये ऐकायला मिळत आहेत.