Just another WordPress site

जिल्हा पोलीस दलातील ३० पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांचे आदेश

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२२ जुलै २३ मंगळवार

जळगाव जिल्हा पोलीस दलातील १५ सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि १५ पोलीस उपनिरीक्षक अशा एकुण ३० पोलीस अधिकारी यांचे बदल्यांचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांनी दि.२१ ऑगस्ट सोमवार रोजी रात्री उशीरा काढले आहे.दरम्यान बदली झालेल्या पोलीस उपनिरीक्षकांना नवीन पदाचा पदभार तात्काळ घेण्याचे निर्देश देखील पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांनी दिले असल्याचे सूत्रांकडून कळविण्यात आले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून जळगाव जिल्हा पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश प्रलंबित होते.याबाबत महाराष्ट्र पोलीस
अधिनियमानुसार सक्षम प्रधिकारी म्हणून जिल्हास्तरावरील पोलीस अस्थापना मंडळ यांना प्रदान असलेल्या अधिकाराचा वापर करून पोलीस
अधिक्षक एम.राजकुमार यांनी दि.२१ ऑगस्ट सोमवार रोजी सदरील आदेश काढले आहेत.यात विनंती बदली,नव्याने हजर झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षकांच्या नवीन नेमणूका,प्रशासकीय बदलीबाबत सर्व बाबींचा विचार करून पोलीस प्रशासनाकडून सोमवारी २१ ऑगस्ट रोजी रात्री उशीरापर्यंत आदेश काढण्यात आले आहेत.यात जळगाव जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याचे १५ सहाय्यक पोलस निरीक्षक आणि १५ पोलीस उपनिरीक्षक अशा एकुण ३० पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांनी काढले आहेत.दरम्यान बदली झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक यांनी तातडीने आपल्या बदलीच्या ठिकाणी तात्काळ पदभार स्विकारावा व तसा अहवाल जिल्हा पोलीस मुख्यालयात पाठविण्याचे निर्देश पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांनी दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.