पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२२ ऑगस्ट २३ मंगळवार
फक्त सरकार टिकावे म्हणून ग्राहकांचा,खाणाऱ्यांचा विचार केला असून कांदा नाही खाल्ला तर कोण मरणार नाही पण शेतकऱ्यांचे नुकसान का करता? तसेच कांद्यावर निर्यात शुल्क लावण्याची गरज नव्हती.त्याचबरोबर ऑक्टोबर,नोव्हेंबर,डिसेंबरची व्यवस्था तुम्ही आज करून ठेवताय एवढी नालायकी? का तर अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार कांद्याचे भाव वाढल्याने पडल्यामुळे असे केले जात आहे.सरकार नामर्द असून सरकार विरोधात आंदोलन करणार असल्याचे सांगत आमदार बच्चू कडू यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.चिंचवड येथे दिव्यांग कल्याण विभाग ‘दिव्यांगाच्या दारी’ या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे त्यापूर्वी बच्चू कडू यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
सरकार नामर्दासारखे वागत असून फक्त सरकार टिकावे म्हणून ग्राहकांचा,खाणाऱ्यांचा विचार केला जात आहे याबाबत शेतकऱ्यांचा विचार सरकार का करत नाही? मी एनडीएमध्ये असलो तरी शेतकऱ्यांच्या बाजूने उभा रहाणे हे माझे कर्तव्य आहे.भाव वाढले तर हस्तक्षेप करता मग भाव कमी झाल्यावर का हस्तक्षेप करत नाहीत.कांदा नाही खाल्ला तर लोक मरणार आहेत का? मग शेतकऱ्यांचे नुकसान का करता? कांद्यावर निर्यात शुल्क लावण्याची गरज नव्हती तसेच ऑक्टोबर,नोव्हेंबर,डिसेंबरची व्यवस्था तुम्ही आज करून ठेवताय एवढी नालायकी? का तर अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार कांद्याचे भाव वाढल्याने पडल्यामुळे असे केले जात आहे.मेक इन इंडिया,मेड इन इंडिया हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण आहे.शेतकऱ्यांचा माल विदेशात गेला तर त्याला सफरचंदचा भाव मिळेल ना?आयात-निर्यात धोरणात स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे तसेच एकही जागा न मागता एनडीएला ताकदीने पाठिंबा देऊ परंतु सरकारच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले आहे.