डॉ.सतीश भदाणे,पोलीस नायक
चोपडा तालुका (प्रतिनिधी) :-
दि.२२ ऑगस्ट २३ मंगळवार
महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील कॉलेज ऑफ फार्मसी चोपडा हे १९९२ पासून तालुक्यातील एनबीए अधिकृत व आयएसओ प्रमाणित महाविद्यालय असून बी.फार्म अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी प्रवेश क्षमता १०० जागांची आहे तसेच एम.फार्म फार्माकोग्नोसी एम.फार्म.फार्मास्युटिक्स या पदव्युतर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रत्येकी १० जागांची क्षमता आहे.त्याचबरोबर पीएच.डी. अभ्यासक्रम देखील संस्थेत घेतला जातो.वर्ष २०२० यावर्षीपासून डी.फार्म हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे.महाविद्यालयात फार्मास्युटिक्स,फार्माकोग्नोसी असे विभाग आहेत.जिथे विद्यार्थ्यांच्या हितासाठी विविध उपक्रम राबविले जातात त्यापैकी फार्माकोग्नोसी विभागात संस्थेचे अध्यक्ष माननीय भैय्यासाहेब ॲड.संदीप सुरेश पाटील,उपाध्यक्ष माननीय श्रीमती आशाताई पाटील आणि सचिव माननीय ताईसाहेब डॉ. स्मिता संदिप पाटील व प्राचार्य डॉ. गौतम पी. वडनेरे यांच्या प्रेरणेने महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या आवारातील परिसरात व बाहेरील परिसरात वृक्षारोपण आज दि.२२ ऑगस्ट २०२३ रोजी करण्यात आले.
सदरील कार्यक्रमाचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष ॲड श्री.संदिप सुरेश पाटील,डॉ.सौ.स्मिताताई संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. वृक्षारोपण करणे हा अतिशय सुंदर उपक्रम असून वनस्पती आणि झाडांनी हा ग्रह राहण्यायोग्य बनवला आहे तसेच झाडांच्या अस्तित्वाशिवाय आपण पृथ्वीवरील जीवनाची कल्पनाही करू शकत नाही त्याचबरोबर वृक्षारोपणाचा एक मूलभूत फायदा म्हणजे ते जीवनदायी ऑक्सिजन प्रदान करतात आणि प्राण्यांनी सोडलेले कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात.तथापि झाडे आपल्याला केवळ ऑक्सिजन देत नाहीत तर फळे, लाकूड,फायबर,रबर इत्यादी गरज पूर्ण करीत असतात तसेच झाडे प्राणी आणि पक्ष्यांचे आश्रयस्थान म्हणून काम करतात असे संस्थेचे अध्यक्ष माननीय भैय्यासाहेब ॲड.संदीप सुरेश पाटील,उपाध्यक्ष माननीय श्रीमती आशाताई पाटील आणि सचिव माननीय ताईसाहेब डॉ. स्मिता संदिप पाटील व प्राचार्य डॉ. गौतम पी. वडनेरे यांनी आपल्या भाषणातून मार्गदर्शन केले.प्रसंगी शिक्षण मंडळाच्या आवारातील परिसरात व बाहेरील परिसरात ५० रोपांची लागवड करण्यात आली.सदरहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्री.गौतम वडनेरे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले.सदरील वृक्षारोपण कार्यक्रमासाठी फार्माकोग्नोसी विभागाचे प्रमुख डॉ.एम.डी.रागीब,एम.डी.उस्मान,वृक्षारोपण समन्वयक प्रा.सौ.कोमल हेडा,प्रा.निशा भाट,प्रा.सौ.कांचन पाटील,प्रा.भूषण पाटील,प्रबंधक श्री.पी.बी.मोरे,फार्माकॉगनोसी विभागातील शिक्षकेतर कर्मचारी श्री.जितेंद्र परदेशी,श्री.उमंग सोनवणे,श्री.प्रमोद माळी यांचे सहकार्य लाभले.