Just another WordPress site

यावल महाविद्यालयात ॲन्टी रॅगिंग सेक्सुअल हॅरेसमेंट विषयावर मार्गदर्शन

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२५ ऑगस्ट २३ शुक्रवार

येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ॲन्टी रॅगिंग सेक्सुअल हॅरेसमेंट या विषयावर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली एकदिवशीय व्याख्यानमाला कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे चंद्रकांत झोपे,समीर झांबरे व दर्पण पाटील हे मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आयोजित कार्यक्रम प्रसंगी प्रमुख वक्ते ॲड.शशिकांत वारूळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ॲन्टी रँगिंग ही संकल्पना स्पष्ट करतांना सांगितले की,विद्यार्थ्यांची मानसिकता ओळखून त्याला कमकुवत बनवण्याचे काम ॲन्टी रॅगिंग मार्फत होत असते.शिक्षण संस्था,अनाथालय,वसतिगृह ह्या ठिकाणी जास्त रॅगिंग होत असते.विद्यार्थ्यांची छेडछाड,पिळवणूक,त्यांच्या जिवाशी खेळणे ह्या मार्फत कोणताही विद्यार्थी परिस्थितीचा बळी ठरू शकतो.भारतात मध्य प्रदेश,उत्तर प्रदेश,उडीसा,पश्चिम बंगालमध्ये रॅगिंगचे प्रमाण जास्त वाढले आहे त्यासाठी शासनाने १९९९ चा कलम २ नुसार २ वर्ष तुरूंगवास १० हजार रू दंड ५ वर्ष शिक्षण संस्थेत प्रवेश नाही असा कठोर कायदा केला आहे असे त्यांनी मार्गदर्शन केले.तर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ॲन्टी रॅगिंग हे संकल्पना मांडतांना सांगितले की,वर्तमान युगात कोणतेही कारण नसतांना एखाद्या व्यक्तीला विद्यार्थी,विद्यार्थिनीला मनस्ताप टारगेट करून बोलणे,आपण स्वतःची तुलना दुसऱ्या बरोबर करणे,महाविद्यालयात शिक्षण घेत असतांना विद्यार्थ्यांनी कोणतेही कारण नसतांना चेष्टा मस्करी करून नाव बदनाम करणे ही रॅगिंगची उदाहरणे आहेत.महाविद्यालयात प्रवेश करतांना विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचा गणवेश आणि ओळखपत्र सोबत बाळगायला हवे म्हणजे विद्यार्थ्यांची ओळख पटते असे त्यांनी नमूद केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.सुधीर कापडे यांनी केले तर  सूत्रसंचालन प्रा.रजनी इंगळे यांनी केले तसेच आभार प्रा.प्रतिभा रावते यांनी मानले.कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार प्रा.ए.पी.पाटील, प्रा.संजय पाटील,डॉ.हेमंत भंगाळे,डॉ.आर.डी.पवार,डॉ.पी.व्ही.पावरा,डॉ.संतोष जाधव,प्रा.सुभाष कामडी,प्रा.प्रशांत मोरे,डॉ. निर्मला पवार यांच्यासह विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेकरिता सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.प्रसंगी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.