यावल-पोलीस नायक (प्रतिधिनी) :-
दि.२५ ऑगस्ट २३ शुक्रवार
भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने हाती घेतलेल्या महत्त्वकांक्षी चंद्रयान-३ मोहीम यशस्वी झाल्याबद्दल तालुक्यातील दहिगाव येथे भारतीय शास्त्राज्ञांचे जल्लोष करून आनंद व्यक्त करण्यात आला तसेच विद्यालयाच्यावतीने इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन करण्यात आले.
दि.२३ ऑगस्ट बुधवार रोजी चंद्रयान-३ चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग झाले असून ही घटना भारताच्या अंतराळ विज्ञानाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदवली गेली आहे.यानिमित्ताने तालुक्यातील दहिगाव येथील आदर्श विद्यालयात चंद्रयान-३ मोहिमेविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली तसेच या मोहिमेसाठी अथक प्रयत्न करणाऱ्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था ( इस्रो)च्या संपूर्ण वैज्ञानिक टीमचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.प्रसंगी आदर्श विद्यालयाकडून अमळनेर तालुक्याचे माजी आमदार खान्देशची मुलुख मैदान तौफ कै.गुलाबराव वामनराव पाटील यांच्या निधनाबद्दल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी मुख्याध्यापक पी.बी.पाटील, शिक्षिका सौ.मीना तडवी,पर्यवेक्षक आर.पी.साळुंके,ज्येष्ठ शिक्षक एम.आर.महाजन आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.