यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२५ ऑगस्ट २३ शुक्रवार
येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात उद्योजकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांना भविष्यातील व्यवसाय विषयक मार्गदर्शन व स्वयंरोजगार उपलब्ध करून घेण्यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली एकदिवसीय व्याख्यानमाला आयोजित केली.सदरील कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे जेष्ठ संचालक सदस्य वसंतराव बापू भोसले हे उपस्थित होते.प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे वक्ते रूशी बेहेडे यांनी सेंद्रिय शेती विषमुक्त शेती या विषयावर मार्गदर्शन करतांना स्वतःच्या हळद शेती व्यवसायाची माहिती दिली तसेच कोरोना काळात घरी बसून हळदीचा व्यवसाय केला शेतकऱ्यांनी कोणताही माल खरेदी अथवा विक्री करतांना व्यापारी वर्गाकडून फसवणूक होऊ नये म्हणून सविस्तर मार्गदर्शन केले.तर प्रा.डॉ.अनिल पाटील यांनी विद्यार्थ्यांना स्वावलंबी शिक्षण विषयक मार्गदर्शन करताना म्हणाले की,कोणतेही शिक्षण हे केवळ नोकरी पुरतेच मर्यादित न ठेवता त्याचा उपयोग व्यवसाय करण्यासाठी केला पाहिजे.आज शिक्षण घेऊन बऱ्याचश्या तरुणांनी सरकारी नोकरी नसल्यामुळे सुशिक्षित बेकार न राहता प्रगतिशील पद्धतीने शेती व्यवसायातून रोजगार उपलब्ध करून घेतला आहे हे सांगताना डॉ.पाटील यांनी किटक नाशके,खते,बि बियाणे,फवारणी यंत्र सामग्री संदर्भात कृषि केंद्र खेड्यात सुरू केले तर गावातल्या गावात रोजगार उपलब्ध होईल असे शेतीपूरक व्यवसाय विषयक मार्गदर्शन केले.तसेच वक्ते अशोक गडे( यावल संकल्प इंटरप्राईजेस ) यांनी केळी पासून अनेक पदार्थांची निर्मिती होत असते या विषयी त्यांनी केळीतुन उत्पादित होणाऱ्या पदार्था विजयी मार्गदर्शन केले.अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.संध्या सोनवणे यांनी मार्गदर्शन करतांना भारत हा तरुणांचा देश आहे या देशात महाराष्ट्र राज्य हे रोजगाराच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर राज्य आहे त्यामुळे तरुणांनी शिक्षण घेत असतानाच व्यवसाय पण शोधला पाहिजे तसेच व्यवसाय करतांना स्वतःची रोजगार निर्मिती स्वतःच केली पाहिजे व त्यातून दुसऱ्याला पण रोजगार संधी उपलब्ध झाली पाहिजे हे हित जपले पाहिजे असे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा.सौ.प्रतिभा रावते यांनी केले तर आभार महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.एम.डी खैरनार यांनी मानले.सदरील कार्यक्रमाला शशिकांत बेहेडे,उपप्राचार्य प्रा.अर्जुन पाटील,प्रा.डॉ.आर.डी.पवार,प्रा.डॉ.सुधीर कापडे, प्रा.डॉ. एच. जी.भंगाळे,प्रा.डॉ.पी.व्ही.पावरा,प्रा.मयुर सोनवणे,प्रा.डॉ.संतोष जाधव,प्रा.सुभाष कामडी,प्रा.डॉ निर्मला पवार,प्रा.नरेंद्र पाटील,प्रा.वैशाली कोष्टी यांच्यासह विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेकरीता सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.