Just another WordPress site

चोपडा तालुक्यातील सुटकार येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

डॉ. सतीश भदाणे,नायक

चोपडा तालुका (प्रतिनिधी) :-

दि.२६ ऑगस्ट २३ शनिवार

तालुक्यातील सुटकार येथील २७ वर्षीय विवाहिता शीतल संदीप ठाकरे यांनी त्याचा राहत्या घरी दुपारी दोन वाजता गळफास घेऊन आत्महत्या केल्याची नुकतीच घटना घडली असून याबाबत अडावद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की,तालुक्यातील सुटकार येथील २७ वर्षीय विवाहिता शीतल संदीप ठाकरे यांनी त्याचा राहत्या घरी दुपारी दोन वाजता गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे.यावेळी घरातील सर्व मंडळी शेतात कामाला गेले असल्यामुळे घरात फक्त शीतल ठाकरे या त्यांच्या दोन्ही लहान मुलींसोबत एकट्या घरात होत्या.दरम्यान दोन वाजून दहा मिनटांनी दोन्ही मुलींनी आईला गळफास घेतलेल्या अवस्थेत बघून एकच आरडाओरड केली प्रसंगी परिसरातील मंडळी धावून आली.सदरील आत्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात असून महिलेचे शव उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून शीतल ठाकरे यांचे माहेर हे चोपडा तालुक्यातील कोळंबा येथील असून तालुक्यातील दोन्ही गावातील नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालय येथे गर्दी केली.याबाबत पुढील तपास अडावद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय जगदीश कोळंबे पुढील तपास करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.