Just another WordPress site

सहायक फौजदार १५ हजाराची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

डॉ. सतीश भदाणे,पोलीस नायक

चोपडा तालुका (प्रतिनिधी) :-

पंधरा हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनचा सहायक फौजदार एसीबीच्या जाळ्यात अडकला असून शिवाजी ढगू बाविस्कर असे लाच प्रकरणी सापळ्यात अडकलेल्या सहायक फौजदाराचे नाव आहे.या प्रकरणातील तक्रारदाराचा चुलत भाऊ व त्याचा मित्र यांना दिनांक २३ ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास तिन पोलीसांनी लासूर ते सत्रासेन रस्त्यावर त्यांची मोटार सायकल अडवून थांबवले असता तुमच्याजवळ गांजा आहे असे सांगुन तुम्ही पोलीस स्टेशनला चला असे त्यांना सांगण्यात आले होते तसेच तुमच्याजवळ गांजा असून तुमच्याविरुद्ध गांजाची केस करायची आहे जर गांजाची केस व मोटार सायकल सोडवायची असेल तर आम्हाला प्रत्येकी ७५ हजार रुपये आम्हाला द्यावे लागतील असे त्यांना सांगण्यात आले होते.

याप्रकरणी तक्रारदार यांचे नातेवाईकाकडुन रात्री ३० हजार रुपये घेतले व मोटार सायकल त्यांनी ठेवून घेतली जर तुम्हाला मोटार सायकल सोडवायची असेल तर तुम्हाला उर्वरीत २० हजार रुपये आम्हाला दयावे लागतीत असे सांगितले त्यानंतर दि.२४ ऑगस्ट गुरुवार रोजी तक्रारदार यांचे कडेस आलोसे यांनी गांजाची केस न करण्यासाठी व मोटार सायकल सोडण्यासाठी २० हजार रुपयाची मागणी केली व तळजोडअंती १५ हजार रुपये पंचासमक्ष आलोसे यांनी लाचेची मागणी करून आलोसे यांनी उर्वरीत १५ हजार रुपये दि.२५ ऑगस्ट शुक्रवार रोजी चोपडा गावी स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे त्यांचे वर चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरील कारवाई पोलीस अधिक्षक नाशिक श्रीमती शर्मिला घारगे- वालावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल वालझाडे,पोलिस निरीक्षक,स.फौ. दिनेशसिंग पाटील,पो.ना.बाळु मराठे,पो.कॉ.राकेश दुसाने यांनी केली.तर कारवाई मदती दरम्यान एन.एन.जाधव पोलीस निरीक्षक,स.फौ. सुरेश पाटील,पो.ह.रविंद्र घुगे,म.पो.हे.कॉ.शैला धनगर,पो.ना.किशोर महाजन,पो.ना.सुनिल वानखेडे,पो.कॉ.प्रदिप पोळ,पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.प्रणेश ठाकुर.पो.कॉ.सचिन चाटे यांनी काम पाहिले.

Leave A Reply

Your email address will not be published.