पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-आज मध्यरात्री एक वाजता चांदणी चौकातील पुल पाडण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी प्रामुख्याने उपस्थिती दिली.काही काळानंतर स्फोट झाला,पुल पडला व साफ सफाईचे काम सुरू करण्यात आले.त्यावेळी पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख चांदणी चौकात काम पाहण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत हजर झाले.एकीकडे हजारो हात रस्ता मोकळा करण्यासाठी संपूर्ण रात्र मेहनत घेत असतानाच दुसरीकडे दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी देखील रात्रभर”फील्ड”वर हजर होते. याबाबत पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त भोईटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्न केला कि,”सर अजून घरी गेले नाहीत का?या प्रश्नावर जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांचे उत्तर होते कि,”काम झाले की जाऊच की”चांदणी चौकातील वाहतूक कोंडीचा अनुभव घेतलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे चांदणी चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी येथील एनडीए रस्ता-बावधन पुल पाडण्याचे नियोजन करण्यात आले होते.त्यासाठी बराच काळ प्रतिक्षा केल्यानंतर अखेर शनिवार, दिनांक २ ऑक्टोबर रोजी पहाटे २ वाजता पुल पाडण्याचे निश्चित करण्यात आले व त्यानुसार नियोजन केल्यानंतर जिल्हाधिकारी देशमुख यांनी शनिवारी सायंकाळी चांदणी चौकात आले.त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून कामाच्या सद्यस्थितीची माहिती पत्रकारांना दिली.दरम्यान, शनिवारी रात्री ११ वाजता महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली.पहाटे २ ऐवजी १ वाजताच चांदणी चौकातील पुल पाडण्याचे ठरविण्यात आले.त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ.देशमुख हे स्वतः 1 वाजता हजर राहिले.त्यानंतर ते तेथीलच “एनएचआयए” कार्यालयात बसून कामाचा आढावा घेत होते.