डॉ. सतीश भदाणे,पोलीस नायक
चोपडा तालुका (प्रतिनिधी)
तालुक्यातील मंगरूळ येथे डॉ.श्वेता मोरखडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.सतीश भदाणे,साहिल बाविस्कर,राज,अविनाश धनगर,विठ्ठल चिंचोरे, आनंदा महाजन यांच्या वतीने मंगरूळ येथील तब्बल ३५० गोवंशीय जनावरांना नुकतेच लसीकरण करण्यात आले.
यानिमित्ताने डॉ.श्वेता मोरखडे यांनी “माझा गोठा स्वच्छ गोठा ” अंतर्गत मंगरूळ गावातील शेकडो शेतकऱ्यांना लंपी आजाराविषयी घ्यावयाची काळजी तसेच लंम्पि लसीकरणाचे फायदे,लसीकरणाविषयी माहिती,गोचीड निर्मूलन तसेच जनावरांच्या आहाराविषयी घ्यावयाची काळजी या विषयी पशुपालकांना माहिती दिली.सदरील लंम्पि लसीकरणा कामी सरपंच ग्रामपंचायत मंगरूळ व गावातील ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले.