डॉ.सतीश भदाणे,पोलीस नायक
चोपडा तालुका (प्रतिनिधी) :-
तालुक्यातील एका गावातील वयस्काने ८ वर्षाच्या चिमूरडीस तंबाखूची पुडी आणून देण्याचा भान करून त्या बालिकेसोबत अश्लील वर्तन व गैर कृत्य केल्याची घटना नुकतीच घडली असून याबाबत चोपडा शहर पोलीस ठाण्यात सदर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,तालुक्यातील गांवी दि.२६ ऑगस्ट शनिवार रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास फिर्यादी आजी यांचे घरापासून काही अंतरावर राहणारा इसम नामे ज्ञानेश्वर बन्सीलाल रायसिंग (कोळी) याने फिर्यादीची नात वय ८ वर्ष हिस तंबाखुची पुडी आणण्याचा बहाणा करुन त्याचे घरात बोलावुन घेतले नंतर त्याने घराचा दरवाजा बंद करुन फिर्यादी यांची नात हिस पकडुन तिचे गालाची पप्पी घेवुन आरोपी याने त्याचे स्वतःचे कपडे काढून फिर्यादी यांची नात हिचे समोर आला नंतर फिर्यादीची नात इचे कपडे काढून तिचा सोबत अश्लील वर्तन व गैरकृत्य केल्याची फिर्याद दिल्याप्रकरणी चोपडा शहर पोलिस ठाण्यात भादवि कलम ३७६ (१) (ए) ३७६ (३) ३७६ (ए) (बी) सह बालकांचे लैगीक अपराधापासून संरक्षण कायदा २०१२ चे कलम ४, ८.१०,१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर आरोपीला अटक करण्यात आली आहे.पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण हे करीत आहे.