अंजनगाव सुर्जी येथे प्रथमच सिनेअभिनेते यांच्या उपस्थितीत होणार दहीहंडी उत्सव !
युवा स्वाभिमान पार्टी मुख्य मार्गदर्शक सुनिलभाऊ राणा यांची माहिती
अनिल गौर,पोलीस नायक
अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.२८ ऑगस्ट २३ सोमवार
जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे प्रथमच सिने अभिनेता यांच्या उपस्थितीत गोकुळ अष्टमी निमित्ताने दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती युवा स्वाभिमान पार्टी मुख्य मार्गदर्शक सुनिलभाऊ राणा यांनी नुकतीच दिली आहे.
आजपर्यंत सिने अभिनेता किंवा अभिनेत्री यांच्या उपस्थितीत अंजनगाव सुर्जी येथे कधीच एव्हढा मोठा दहीहंडी उत्सव झाला नाही परंतु खासदार नवनीत राणा व आमदार रवि राणा यांच्या संकल्पनेतून यंदा दहीहंडी उत्सव मनसोक्त साजरा करण्याच्या निर्णयामुळे येत्या ११ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेपासून हा दहीहंडी कार्यक्रम सुरु होणार असल्याचे युवा स्वाभिमान पार्टीचे मुख्य मार्गदर्शक सुनीलभाऊ राणा यांनी अंजनगाव सुर्जी येथे दि.२६ ऑगस्ट शनिवार रोजी येथील रेस्ट हाऊस येथे जाहीर केले आहे.तरी पार्टी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासोबत संवाद साधून प्रत्येकाची जबाबदारी म्हणून प्रत्येकाने या दहीहंडी उत्सवाला प्रतिसाद द्यावा तसेच हा उत्सव सर्व नागरिकांचा असल्याकारणाने सर्वांनी हा उत्सव आनंदाने साजरा करावा असे आवाहन सुनीलभाऊ राणा यांनी यावेळी केले.या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुनील राणा यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.