अनिल गौर,पोलीस नायक
अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.२८ ऑगस्ट २३ सोमवार
‘ओवाळीते भाऊराया’ बहिण भावातील राखीच्या पवित्र धाग्याचा स्नेह जपत आमदार ऍड यशोमती ठाकूर यांनी यावर्षी सुद्धा तिवसा विधानसभा मतदारसंघातील तिवसा,मोर्शी,भातकुली,अमरावती व जिल्ह्यातील इतर अशा दिड लाख भावांना राख्या पाठविल्या आहेत.”हे बंध स्नेहाचे,हे बंध रक्षणाचे” राखीचा एक पवित्र धागा तुमच्या अन् माझ्यातल ऋणानुबंध घट्ट करणारा आपुलकी,प्रेम आशिर्वादाचा ठाम विश्वास वृद्धिंगत करणारा हा स्नेह आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांनी आजवर जपला आहे.
राखी पाठविण्याची १६ वर्षाची परंपरा …..तिवसा विधानसभा मतदारसंघातील लाखो भावांना तसेच जिल्ह्यातील इतरही भावांना राखी पाठविण्याची परंपरा आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांनी आमदार होण्यापुर्वीपासून अखंडीतपणे जपली आहे.आमदार झाल्यानंतर व नंतर राज्याच्या मंत्री व पालकमंत्री झाल्यानंतरही दरवर्षी राखी पाठविण्याच्या परंपरेत कधीच खंड झाला नाही हे विशेष !.
राखी सोबतच भाऊरायांना भावनिक सादही…..राखीच्या लिफाफ्यात राखीसह भाऊरायांना भावनिक साद घालणारे एक पत्रही त्यांनी पाठविले आहे.या पत्रातील मजकूर हा भावनिक असून त्या म्हणतात,”हे बंध स्नेहाचे,हे बंध रक्षणाचे” राखीचा एक पवित्र धागा तुमच्या आणि माझ्यातले ऋणानुबंध घट्ट करणारा.आपुलकी,प्रेम आशीर्वादाचा ठाम विश्वास वृद्धिंगत करणारा ‘हे बंध स्नेहाचे,हे बंध रक्षणाचे’,आयुष्याच्या कुठल्याही क्षणी,कुठल्याही वळणावर बहिणीच्या हक्काच्या हाकेला मदतीसाठी तत्परतेने धावून येणारा भाऊराय ही अनुभूती देणारा हे पवित्र बंधन अशी भावनिक साद घालून त्या पुढे म्हणतात,“तुमच्या सर्वांच्या पवित्र विलक्षण आशीर्वादामुळेच मी आजवर गगन भरारी घेवू शकले आणि निडरपणे लढायची शक्ती या अदृश्य पवित्र आशीर्वादातून प्राप्त झाली असा हा भावनिक मजकूर आहे.
सत्ता असली नसली तरी तुमचे प्रेमच ऊर्जास्त्रोत-आमदार यशोमती ठाकूर
गेल्या १६ वर्षापासून लाखो भाऊरायांना मी राखीचा हा एक पवित्र धागा नियमितपणे पाठविते.आमदार होण्यापुर्वीपासून मी ही परंपरा आजवर जपली आहे आणि भविष्यातही यात कधीच खंड पडणार नाही.संकट जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने ती निघून सुद्धा जातात पण अशा कसोटिच्या काळात मातीशी घट्ट रुजून राहायचे असते.आपल्या माणसासाठी निडरपणे लढायचे असते हा वसा,हे संस्कार कुटुंबातूनच मिळाले आहे आणि ते मी आजवर जपले आहे आणि पुढेही जिवापाड जपणार आहे असे आमदार यशोमती ठाकूर यांनी नमूद केले आहे.