मुंबई -पोलीस नायक (प्रतिनिधी) :- आता महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना स्वस्त किंमतीतील रेशन धान्य मिळणार नसल्याची मोठी बातमी समोर आली आहे.या संदर्भातील निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारकडून नुकताच घेण्यात आला आहे.याकरिता राज्य सरकारकडून ०१सप्टेंबर २२ पासून रेशन कार्डाची पडताळणी केली जाणार आहे.परिणामी या निर्णयामुळे राज्यातील अनेक लाभार्थ्यांना स्वस्त धान्यापासून मुकावे लागणार आहे.
राज्यातील काही नागरिकांचे आर्थिक उत्पन्न वाढले असुनदेखील स्वस्त धान्याचा लाभ घेत आहेत व सदरील लाभार्थ्यांकडून हे धान्य जाडा दराने विक्री केली जात आहे.तसेच या धान्याचा वापर खाण्याकरिता न वापरता गुरांना दान(भरडा)म्हणून देखील वापर केला जात असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे.त्यामुळे जे खरोखर गरजू लाभार्थी आहेत त्यांच्या पर्यंत स्वस्त धान्याचा लाभ मिळण्यास अडचणी निर्माण होत आहे.शिवाय जे लाभार्थी दारिद्र रेषेखालील कार्डधारक असून त्यांना रेशनच्या धान्याचा पुरवठा होत आहे यातील काही लाभार्थ्यांकडे दारिद्रय रेषा कार्ड नसल्याची बाबही समोर आली आहे.परिणामी रेशन धान्य वाटपातील गौडबंगाल रोखण्याकरिता राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.परिणामी बहुतेक लाभार्थ्यांना यापुढे रेशन धान्य मिळणार नसल्याची बाब स्पष्ट झाली आहे.याबाबत रेशन कार्डांची पडताळणी हि १सप्टेंबर २२ पासून होणार असल्याचा निर्णयही राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे.