Just another WordPress site

यावल येथे वनकर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२९ ऑगस्ट २३ मंगळवार

येथील पुर्व वन परिक्षेत्रच्या कार्यालयात यावल,रावेर तालुक्यातील प्रादेशिक वनविभाग आणी यावल पुर्व,यावल पश्चिम आणि रावेर वनक्षेत्रा यांच्या संयुक्त विद्यमाने सातपुड्यातील वने,वन्यजीव संरक्षण व देखभाल करणाऱ्या क्षेत्रीय वन अधिकारी कर्मचारी तसेच कार्यालयीन अधिकारी,कर्मचारी यांची वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबीर उप वन संरक्षक यावल वनविभागाचे जमीर शेख यांचे संकल्पनेतून व प्रयत्नाने शिबीराचे आयोजित करण्यात आलेले शिबीर नुकतेच संपन्न झाले.

यानिमित्ताने यावल येथे आयोजीत मोफत आरोग्य तपासणी शिबीरास ऋषीकेश रंजन वनसंरक्षक धुळे वनवृत्त धुळे आणि ए.आर.प्रविणकुमार उप वनसंरक्षक यावल वनविभाग जळगांव यांच्या मार्गदर्शनाखाली स्पार्कस लाईफ केअर घाटकोपर मुंबई या संस्थेतर्फे वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी,वनपाल,लेखापाल,वनरक्षक अधिसंख्य वनमजुर आणि रोजंदारी वनमजुर असे एकूण ११२ वन अधिकारी,वनकर्मचारी यांचे शरीराचे शुगर,बीपी,रक्त,हृदय,किडनी,वात,पित्त असे विविध ८४ प्रकारच्या मोफत आजारांची वैद्यकीय तपासणी करीत औषधोपचार आणि खाण्याचे पदार्थ या बाबत सल्ला व मार्गदर्शन डॉ.सुनिल बारगे,डॉ.मधुकर आव्हाड,डॉ. विश्वास पवार,डॉ.कल्पेश सोले,डॉ.श्रीमती वैशाली गवाले,डाॅ.मदन पिसे,डॉ.नईमुद्दीन मल्लीक आणि एस.के.राकेश यांनी केले.सदर शिबीर प्रथमेश हडपे सहाय्यक वनसंरक्षक यावल विक्रम पदमोर वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पुर्व,सुनील भिलावे वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पश्चिम,अजय बावणे वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर यांचे उपस्थितीत झाला.या शिबीर कार्यक्रमाचे नियोजन विक्रम पदमोर वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पुर्व यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.