Just another WordPress site

सातपुडा पर्वतातील वनजमीवरील होणारे बेकायदेशीर अतिक्रमण काढण्याचा ग्रामसभेत ठराव मंजुर

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२९ ऑगस्ट २३ मंगळवार

मध्यप्रदेशातील परप्रांतीय नागरीकांकडून होणारे सातपुडा पर्वताच्या वन जमिनीवरील बेकायद्याशीर अतिक्रमण करीत असल्यामुळे स्थानिक रहिवाशांना आदिवासीच्या हक्काच्या सवलतीचा फायदा होत नसल्याने सातपुडा पर्वतातील वनजमीवरील होणारे बेकायदेशीर अतिक्रमण काढण्याबाबतचा ठराव तालुक्यातील वड्री येथील ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत मंजुरी देत ग्रामसभा शांततेच्या वातावरणात नुकतीच संपन्न झाली.

तालुक्यातील वड्री येथे ग्रामपंचायतच्या आवारात गावाचे प्रथम नागरिक सरपंच अजय भागवत भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा शांततेच्या वातावरणार पार पडली.या ग्रामसभेत सातपुडा पर्वताच्या जंगलात गेल्या अनेक दिवसापासुन सातपुड्याच्या वन जमिनीवर मध्यप्रदेश या परप्रांतीय राज्यातुन शेकडो नागरिक आदिवासी म्हणुन बेकायद्याशीर वन जमीनीवर अतिक्रमण करून राहात असल्याने स्थानिक आदिवासींच्या हक्काच्या सवलती त्यांना देण्यात येत असल्याचा प्रश्न यावेळी आदिवासी समाज बांधवांनी उपस्थित केला.यावेळी वन विभाग,वन व्यवस्थापन समिती व ग्राम पंचायतच्या वतीने संयुक्त कारवाई करीत ही अतिक्रमण काढण्याच्या ठरावास मंजुरी देण्यात आली.याशिवाय मोदी आवास योजना,वन व्यवस्थापन समितीमार्फत एससी,एस टी,ओबीसी वैयक्तीक गॅस वाटप करण्यास मंजुरीसह स्मशानभुमी,आदिवासी बांधवांची क्रबस्तान (दफनभुमी) ठीकाणी संरक्षण भिंत बांधणे,गावात शौचालय बांधणे या विषयास मंजुरी देण्यात आली.यावेळी  शिक्षण,  आरोग्य,महिला बाल कल्याण व समाजकल्याण,शबरी योजना,रमाई घरकुल योजना या संदर्भात लाभ घेणाऱ्या नागरीकांना ग्रामसेवक मजित तडवी यांनी सविस्तर माहिती देत या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.या ग्रामसभेस सरपंच अजय भालेराव,उपसरपंच पंकज चौधरी,ग्राम पंचायत सदस्य नबाब तडवी,सरदार तडवी,वैशाली चौधरी,कविता पाटील,नयना चौधरी,सलमा तडवी,फिजा तडवी यांच्यासह वनपाल रविन्द तायडे,वनरक्षक जी.बी.डोंगरे,कृषी विभागाचे जि.बी.निंबोळकर,पोस्ट विभागाचे अधिकारी शेख,आदिवासी चळवळीचे कार्यकर्ते बशीर तडवी, अय्युब तडवी,माजी पोलीस पाटील गोविंदा सुरवाडे यांच्यासह ग्रामस्थ मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते.प्रसंगी ग्रामसभेची प्रस्तावना,सुचना व उपस्थितांचे आभार ग्रामसेवक मजीत तडवी यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.