अमळनेर-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२९ ऑगस्ट २३ मंगळवार
तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखाना मालपूर अंतर्गत मुडी प्र अ येथे पशुधन विकास अधिकारी मार्गदर्शनाखाली नुकतेच लम्पि आजारावरील लसीकरण व जनजागृती अभियान राबविण्यात आले.
तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखाना मालपूर अंतर्गत मुडी प्र अ ग्रामपंचायत येथे पशुधन विकास अधिकारी मार्गदर्शनाखाली सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांना ‘माझा गोठा स्वच्छ गोठा’ तसेच लंपी अजाराबद्दल माहिती व शेतकरी यांनी घ्यावयाची काळजी त्याचबरोबर लंपी संबंधित महत्त्वाचे शासन निर्णय तसेच उपाययोजना बद्दल माहिती यावेळी देण्यात आली.प्रसंगी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नाचे निवारण करण्यात आले.यावेळी डॉ .विक्रांत पाटील,परिचर यु.ए.बोरसे यांच्यासह सरपंच व गावातील नागरिक उपस्थित होते.