Just another WordPress site

शेतकऱ्यांना मोबाईलवर एस.एम.एसद्वारे तात्काळ वजनाची माहिती देणारी खानदेशातील पहिली कृषि उत्पन्न बाजार समिती

डॉ.सतीश भदाणे,पोलीस नायक

चोपडा तालुका (प्रतिनिधी) :-

दि.३०ऑगस्ट २३ बुधवार

चोपडा कृषि उत्पन्न बाजार समितीचे चोपडा,अडावद व गलंगी भुईकाट्यावर शेतकरी बांधवांना आपल्या शेतमालाचे वजन एस.एम.एस.द्वारे तात्काळ माहीती व्हावी म्हणून चोपडा,अडावद व गलंगी भुईकाट्यावर एस.एम.एस.मॉडर्न सिस्टीम काल दि.२९ ऑगस्ट मंगळवार पासुन सुरु करण्यात आलेली असुन अशी शेतकरी वर्गासाठी सुविधा देणारी चोपडा कृषी उत्पन्न बाजार समिती हि खान्देशातील पहिली बाजार समिती ठरली आहे.तरी शेतकरी बांधवानी आपले वाहन मोजतांना आपला मोबाईल नंबर देऊन सहकार्य करावे असे चोपडा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कळविण्यात आले आहे.

शेतकऱ्यांच्या हितासाठी तसेच शेतकऱ्यांची मोजणी करतांना कुठलीही फसवणूक होऊ नये याकरिता चोपडा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने पुढाकार घेऊन काल दि.२९ ऑगस्ट मंगळवार रोजी चोपडा,अडावद व गलंगी भुईकाट्यावर एस.एम.एस.मॉडर्न सिस्टीम बसवून शेतकऱ्यांना मोलाचा हातभार लावण्यास मदत केली आहे.यानिमित्ताने आयोजित कार्यक्रम प्रसंगी बाजार समिती सभापती नरेंद्र वसंतराव पाटील,उपसभापती विनायकराव रामदास चव्हाण,संचालक घन:श्याम निंबाजी पाटील,नंदकिशोर भानुदास पाटील,विजय शालीकराव पाटील, अनिल रामदास पाटील,मिलींद गणपतराव पाटील,सोनाली नारायण पाटील,कल्पना भरत पाटील,मनोज अशोकराव सनेर,नंदकिशोर चिंधु धनगर,गोपाल श्रीराम पाटील,वसंत पिरन पाटील,किरण रामलाल देवराज,शिवराज संभाजी पाटील,सुनिल मगनलाल अग्रवाल,सुनिल तिलोकचंद जैन,नितीन शालीग्राम पाटील,सचिव आर.बी.सोनवणे,उपसचिव जे.एस.देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.