सादिक शेख,पोलीस नायक
मोताळा तालुका (प्रतिनिधी) :-
दि.१ सप्टेंबर २३ शुक्रवार
बुलढाणा जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या वाढदिवसानिमित्त काल दि.३१ ऑगस्ट रोजी धामणगाव बढे पोलीस स्टेशन तर्फे विविध शाळांमध्ये पुस्तके व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
यानिमित्ताने धामणगाव बढे येथील पोलीस निरीक्षक सुखदेव भोरकडे यांच्या नेतृत्वाखाली विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.यात जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा धामणगाव बढे येथील चारशे विद्यार्थ्यांना,जिल्हा परिषद मराठी कन्या शाळा धामणगाव बढे येथील शंभर विद्यार्थिनींना विविध शालेय साहित्य वितरित करून तसेच मिठाई वाटप करून आनंदाने वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी धामणगाव बढे येथील ठाणेदार सुखदेव घोरपडे यांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेला स्पर्धा परीक्षा पुस्तके भेट देण्यात आले.प्रसंगी पोलीस निरीक्षक सुखदेव भोरकडे यांच्यासह त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी,शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.