यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१ सप्टेंबर २३ शुक्रवार
तालुक्यात विनापरवाना वाळुची वाहतुक करणाऱ्यांची मुजोरी वाढली असुन महसुलच्या अधिकाऱ्यांवर हल्ला करण्याची ही तिसरी घटना असुन वढोदे ता.यावल ते शिरसाड रस्त्यावर विनापरवाना वाळू वाहतुक करणाऱ्यांनी पर्यवेक्षक म्हणुन नेमणुकीस असलेल्या महिला मंडळ अधिकारी बबीता चौधरी यांना कर्तव्यावर असतांना धक्काबुकी व शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी यावल पोलीसात त्या अज्ञात वाळु वाहतुक करणाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहीती अशी की,तालुक्यातील बामणोद येथे बबीता सुधाकर चौधरी या मंडळ अधिकारी म्हणुन कार्यरत असुन दि.३१ ऑगस्ट रोजी त्यांचेकडे महसुल प्रशासनाच्या वतीने थोरगव्हाण तालुका यावल करीता पर्यवेक्षक म्हणुन नेमणुक करण्यात आली असतांना काल दि.३१ ऑगस्ट गुरूवार रोजी दुपारी १२.१५ वाजेच्या सुमारास पर्यवेक्षक बबीता चौधरी या आपल्या कडील खाजगी वाहनाने थोरगव्हाणकडे जात असतांना वढोदे प्रगणे यावल ते शिरसाड या रस्त्यावर वढोदे गावाजवळ विना क्रमांकाचे निळ्या रंगाचे स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर वाळु वाहतुक करीत असतांना आढळुन आले.संबधीत ट्रॅक्टर चालकाकडे बबीता चौधरी यांनी वाळु वाहतुकीचा परवाना मागीतला असता परवाना नसल्याचे सांगुन थोरगव्हाणच्या पर्यवेक्षक आणी बामणोदच्या महिला मंडळ अधिकारी असलेल्या बबीता सुधाकर चौधरी यांच्याशी ट्रॅक्टरचालक निलेश समाधान सोनवणे याने हुज्जत घातली व धक्काबुकी करीत विनयभंग करून शिविगाळ करीत जिवे ठार मारण्याची धमकी दिली व शासकीय कामात अडथळा निर्माण केला.दरम्यान संबधित ट्रॅक्टर वाहन चालकाने घटनास्थळावरून निलेश सोनवणे राहणार थोरगव्हाण तालुका यावल व त्याच्या सोबत असलेल्या एका अनोळखी इसमाने पळवुन नेले.याबाबत मंडळ अधिकारी बबीता चौधरी यांनी यावल पोलीस ठाण्यात खबर दिल्याने विविध कलामान्वये संबंधित वाळू माफिया विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.