Just another WordPress site

तिहेरी हत्याकांडामुळे भुसावळ शहर हादरले,जुना वाद उफाळल्याची शक्यता ?

निखिल राजपूतचा खून कौटुंबिक वादातून ?

भुसावळ-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२ सप्टेंबर २३ शनिवार

भुसावळ शहरात दोन दिवसात तीन खून झाल्यामुळे येथील गुन्हेगारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.सदरहू या तिहेरी हत्याकांडामुळे शहर परिसर चांगलाच हादरला आहे.यात कंडारी येथील खुन प्रकरणामध्ये जुना वाद उफाळून आला असल्याची शक्यता परिसरातून वर्तविण्यात येत आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,कंडारी गावातील शांताराम साळुंखे वय-३३ वर्षे व राकेश साळुंखे वय-२८ वर्षे या दोन्ही सख्ख्या भावंडांचा गावातील एका परीवाराशी जुना वाद होता यातून त्यांच्यावर काल रात्री अकराच्या सुमारास प्राणघातक हल्ला करण्यात आला.या हल्ल्यात हल्लेखोरांनी साळुंखे बंधूंवर हल्ला चढवत तलवारीसह चाकूने सपासप वार करण्यात आल्याने दोन्ही भावंड जागीच गतप्राण झाली तर इंगळे व साळुंखे नामक इसम जखमी झाले असून यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.कंडारी गावातील शांताराम साळुंखे वय-३३ वर्षे व राकेश साळुंखे वय-२८ वर्षे या दोन्ही सख्ख्या भावंडांच्या करून मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान सदरील हल्ल्याची माहिती मिळताच भुसावळ शहरचे पोलीस निरीक्षक गजानन पडघण व बाजारपेठचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पोलीस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली व त्यांनी जखमींना तात्काळ ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल केले.दरम्यान दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी ट्रामा सेंटरमध्ये रवाना करण्यात आले आहेत.या प्रकरणातील आरोपी निष्पन्न झाले असून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.या भयंकर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून भितीचे वातावरण पसरले आहे तर दुसरीकडे कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

निखिल राजपूतचा खून कौटुंबिक वादातून?…….कंडारी भागातील जुन्या वादातून दोघे सख्ख्या भावंडांच्या हत्येची घटना ताजी असतांनाच भुसावळात कुविख्यात गुन्हेगार निखिल राजपूतची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती आज दि.२ सप्टेंबर शनिवार रोजी पहाटे पाच वाजता समोर आल्याने भुसावळसह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान भुसावळ शहरातील श्रीराम नगर भागातील पाण्याच्या टाकीवर निखिल राजपूत व संशयितांमध्ये शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास वाद झाल्यानंतर निखिल राजपूत याच्या गळ्यावर चाकूने सपासप वर करीत त्याची हत्या करण्यात आल्याची चर्चा परिसरात चर्चिली जात आहे.

सदरहू निखिल राजपूत हा पोलिसांच्या रेकार्डवर कुविख्यात गुन्हेगार म्हणून प्रसिद्ध होता.यापूर्वी त्याच्यावर हद्दपारीच्या कारवाईसह पोलिसांच्या अंगावर हात टाकण्यासह धमकी देणे,खंडणी वसूल करणे,मारहाण करणे अशा गंभीर गुन्ह्यात निखिल राजपूत हा संशयित आरोपी होता. दरम्यान शहरातील श्रीराम नगर येथील पाण्याच्या टाकीजवळ त्याचे वास्तव्य होते.काल दि.१ सप्टेंबर शुक्रवार रोजी कौटुंबिक वादातून त्याच्या गळ्यावर चाकूने सपासप वार करीत त्याचा खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याबाबत एका संशयिताचे नाव निष्पन्न झाले असून कौटुंबिक वादातून त्याने हा खून केल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे.सदरील संशयिताची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.