डॉ.सतीश भदाणे,पोलीस नायक
चोपडा तालुका (प्रतिनिधी) :-
दि.२ सप्टेंबर २३ शनिवार
तालुक्यात सत्रासेन ते उमर्टी रोडवर मोरचिडा शिवारात गावापासून जवळपास नऊ किलोमीटर अंतरावर दोन आरोपी तीन गावठी पिस्तूल घेऊन जात असतांना ग्रामीण पोलिसांनी त्यांना पकडून कारवाई केली आहे सदरील दोन्ही आरोपींना तीन दिवस पोलीस कोठडी मिळालेली आहे.
(पोलिसांनी आरोपींकडून जप्त केलेले तीन गावठी पिस्तूल व दोन मोबाईल फोन)
दि.१ सप्टेंबर शुक्रवार रोजी पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास आरोपी राजेंद्र दत्तात्रय मुसळे वय २२ रा.उरुळी कांचन कोरेगाव रोड भुजनगर पुणे आणि अनिकेत सूर्यकांत पीठे वय २४ वर्ष राहणार उरळी कांचन तळवणी चौक पुणे हे दोन आरोपी त्यांच्या ताब्यात असलेली मारुती सुझुकी कंपनीच्या स्विफ्ट कारमध्ये क्रमांक एम एच १२ यु सी १३७४ या कारमधून सीट खाली २५ हजार रुपये किमतीचा एक गावठी बनावटीचा कट्टा तर दुसरा गावठी कट्टा २५ हजार रुपये किमतीचा आरोपी राजेंद्र मुसळे यांचे डावे बाजूला कमरेस लावलेला मिळून आला आणि तिसरा पंचवीस हजार रुपये किमतीचा गावठी बनावटीचा कट्टा हा आरोपी अनिकेत पीठे यांच्या डाव्या कमरेस लावलेला मिळून आला.सदर कारवाई चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन मधील पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे त्यामुळे या दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.त्यांच्याकडून १० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल ६ लाख रुपये किमतीची एक स्विफ्ट कार,२ हजार २०० रुपये रोख आरोपी राजेंद्र मुसळे यांच्या जवळ मिळून आले असा एकूण ६ लाख ८७ हजार २०० रुपयांचा ऐवज चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे तात्पुरता प्रभार असलेले व चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली आहे.सदर घटनेची पोलिसांना गुप्त माहिती प्राप्त झाल्याने पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे.चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनमधील पो.हे.का किरण वासुदेव पाटील यांच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आरोपी राजेंद्र मुसळे व अनिकेत सूर्यकांत पीठे यांच्या विरोधात कलम ३/२५,७/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरील गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे हे करीत आहेत.