गोपाल शर्मा,पोलीस नायक
अकोला जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.५ सप्टेंबर २३ मंगळवार
तेलारा शहरात खाजगी कोचिंग क्लासेस चालकांची मोठी धूम माजली असून नर्सरीपासून तर पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत खाजगी कोचिंग क्लासेस तेल्हारा शहरात गल्लोगल्ली सुरू आहेत.सदरील खाजगी कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांना फीच्या नावाखाली दरवर्षी लाखो करोडो रुपयांची उलाढाल होत असल्याने संबंधित आयकर विभागाने या खाजगी क्लासेसबाबतची चौकशी करण्याची गरज असल्याची चर्चा शहरवासियांमध्ये सध्या चर्चिली आहे.सदरहू सदरील खाजगी क्लासेसचे वार्षिक उत्पन्न किती? खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये एका बॅचमध्ये एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती?प्रत्येक विद्यार्थ्यांकडून वर्षाकाठी किती रुपये फी घेतली जाते? त्यांना रीतसर कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेशाची पक्की पावती दिली जात आहे काय? खाजगी कोचिंग क्लासेस संचालक नियमित आयकर भरत आहे काय? याबाबत आयकर विभागाने संबंधित कोचिंग क्लासेसची शहरात येऊन चौकशी केल्यावरच सत्य जनतेसमोर येईल ? असेही शहरवासियांमध्ये बोलले जात आहे.
यात तेलारा शहरात माधवनगर,गजानन नगरबस स्थानकजवळ,गौतमेश्वर नगर,सराफा लाईन,भाजी मंडी जवळ,जुने शहर अशा विविध ठिकाणी खाजगी कोचिंग क्लासेस सुरू असून संबंधित खाजगी कोचिंग क्लासेस चालकांकडून गरीब विद्यार्थ्यांकडून मनमानी पद्धतीने वर्षाकाठी हजारो रुपयांची फी घेतल्या जात असून खाजगी कोचिंग क्लासेस संचालक वाटेल तिथे आपल्या खाजगी कोचिंग क्लासेसचे विना परवानगी घेता व नगरपालिका प्रशासनास न जुमानता जाहिरातींचे बोर्ड वाटेल तिथे लावत असल्याची चर्चा असून सदरील क्लासेस संचालक नगर परिषदेची रीतसर परवानगी घेत आहे काय? व जाहिरातींचा महसूल भरत आहे काय? याबाबतचे सत्य शहरवासीयांसमोर येणे गरजेचे असल्याचे शहरवासियांमध्ये बोलले जात आहे.तसेच खाजगी कोचिंग क्लासेसवर शासनाचे कोणतेच नियंत्रण नसल्यामुळे गरीब विद्यार्थ्यांकडून मनमानी पद्धतीने अव्वाच्या सव्वा फी आकारणी करून गरीब विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक केल्या जात आहे.सदरहू विद्यार्थ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या वार्षिक हजारो रुपयांच्या फीमध्ये खाजगी कोचिंग क्लासेस संचालक आयकर नियमित भरत आहे काय?तेल्हारा शहरात एकूण किती खाजगी कोचिंग क्लासेस सुरू आहे यांची नोंद शासन दरबारी उपलब्ध आहे काय? तसेच सदरील खाजगी कोचिंग क्लासेसचे वार्षिक उत्पन्न किती याचा लेखाजोखा आयकर विभागाकडे दरवर्षी संकलित केला जातो काय ?त्याचबरोबर एका खाजगी कोचिंगच्या बॅचमध्ये विद्यार्थ्यांची संख्या किती?त्यांच्याकडून वर्षासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांकडून किती रुपये घेतली जाते? विद्यार्थ्यांना त्याची रीतसर पक्की बिल पावती दिली जात आहे काय?सदरहू खाजगी क्लासेस संचालकांकडून जर विद्यार्थ्यांची व पालकांची आर्थिक पिळवणूक होत असेल तर ही पिळवणूक कधी व कोण थांबवणार? असे विविध प्रश्न शहरवासियांमध्ये उपस्थित केले जात आहेत.परिणामी खाजगी कोचिंग क्लासेस संचालकांकडून मनमानी पद्धतीने फी आकारणी करून गरीब विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक केल्या जात असल्याने आयकर विभागाने तेल्हारा शहरात येऊन चौकशी केल्यावरच सत्य जनतेसमोर येईल? अशी जोरदार चर्चा तेल्हारा शहरात सुरू आहे.