यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.५ सप्टेंबर २३ मंगळवार
तालुक्यातील सांगवी बु॥ येथील जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेचे उपशिक्षक अतुल रमेश चौधरी यांना नुकताच शासनाच्या वतीने सन २३-२४ या वर्षासाठी जिल्हा शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
याबाबत जळगाव जिल्हा परिषदच्या वतीने जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी जिल्ह्यातील प्राप्त झालेल्या २३ प्रस्तवापैकी एकुण १५ शिक्षकांचे प्रस्तावास विभागीय आयुक्त नाशिक विभाग यांच्याकडे पाठविण्यात आले होते त्यानुसार दि.४ सप्टेंबर २०२३ रोजी विभागीय आयुक्त नाशिक
यांनी काही पात्र शिक्षकांच्या निवडीस मान्यता दिली असुन यात तालुक्यातील सांगवी बु.येथील जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेचे उपशिक्षक अतुल रमेश चौधरी यांची या जिल्हास्तरीय शिक्षक पुस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.याबाबत सदरील माहितीचे पत्र यावल
तालुका गटशिक्षण विश्वनाथ धनके यांना जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी पत्र पाठवुन कळविली आहे.सदरहू
उपशिक्षक अतुल रमेश चौधरी यांची जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे विविध स्तरातुन स्वागत केले जात आहे.