यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.५ सप्टेंबर २३ मंगळवार
तालुक्यातील डोंगर कठोरा येथे ग्रामपंचायतच्या वतीने आज दि.५ सप्टेंबर मंगळवार रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आयोजित कार्यक्रमात सलग दुसऱ्या वर्षी शिक्षक दिनानिमित्ताने जिल्हा परिषद मराठी शाळा डोंगर कठोरा व डोंगरदा,उर्दू शाळा डोंगर कठोरा,अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज डोंगर कठोरा,शासकीय माध्यमिक आश्रम शाळा डोंगर कठोरा या शाळांतील शिक्षक वर्ग,सेवानिवृत्त शिक्षक व अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस यांचा शाल,श्रीफळ व आकर्षक ट्राफी देऊन सत्कार करण्यात आला.
यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच नवाज तडवी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद शाळा केंद्र प्रमुख महंमद तडवी,अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक नितीन झांबरे,ग्रामविकास अधिकारी ए.टी बगाडे,उपसरपंच धनराज पाटील,ग्रामपंचायत माजी सरपंच व विद्यमान ग्रा.पं.सदस्य मनोहर महाजन,ग्रामपंचायत सदस्य दिलीप तायडे, ऐश्वर्या कोलते,आशा आढाळे,कल्पना पाटील,हेमलता जावळे,कल्पना राणे हे होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच नवाज तडवी व प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद शाळा केंद्र प्रमुख महंमद तडवी यांच्या हस्ते डॉ,सर्वपल्ली राधाकृष्णन व सरस्वती यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. तदनंतर उपस्थित मान्यवर व प्रमुख पाहुण्याचा सत्कार व जिल्हा परिषद मराठी शाळा डोंगर कठोरा व डोंगरदा,उर्दू शाळा डोंगर कठोरा,अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज डोंगर कठोरा,शासकीय माध्यमिक आश्रम शाळा डोंगर कठोरा या शाळांतील शिक्षक वर्ग,सेवानिवृत्त शिक्षक व अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस यांचा शाल,श्रीफळ व आकर्षक ट्राफी देऊन सत्कार करण्यात आला.प्रसंगी मयत शिक्षकांना दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक एन.व्ही.वळींकर,पी.पी.कुयटे,शासकीय माध्यमिक आश्रम शाळेचे उपशिक्षक एम.ई.जंजाळ,हर्षाली जावळे,ग्रामपंचायत सदस्य मनोहर महाजन,कल्पना राणे व कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच नवाज तडवी यांनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी केलेल्या कार्याबाबत माहिती दिली तर ग्रामपंचायत सदस्य दिलीप तायडे यांनी महात्मा ज्योतिबा फुले तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षणाकरिता केलेल्या कार्याची तसेच त्यांना स्त्रीशिक्षण सुरु करतांना सोसाव्या लागणाऱ्या यातना याबाबत विस्तृत अशी माहिती सांगितली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक,सूत्रसंचालन व उपस्थित मान्यवरांचे आभार शासकीय माध्यमिक आश्रम शाळा मुख्याध्यापक एस.एन.वानखेडे यांनी मानले.या कार्यक्रमाला जिल्हा परिषद मराठी शाळा डोंगर कठोरा व डोंगरदा,उर्दू शाळा डोंगर कठोरा,अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज डोंगर कठोरा,शासकीय माध्यमिक आश्रम शाळा डोंगर कठोरा या शाळांतील शिक्षक वर्ग,सेवानिवृत्त शिक्षक व अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.