यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.७ सप्टेंबर २३ गुरुवार
तालुक्यातील डोंगर कठोरा येथे एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प ‘पोषण अभियान’ अंतर्गत आज दि.७ सप्टेंबर गुरुवार रोजी जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा व अंगणवाड्यांच्या माध्यमातून “सही पोषण,देश रोशन”या उपक्रमातून जनआंदोलन व आरोग्य तपासणी तसेच श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्ताने दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यानिमित्ताने जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा व अंगणवाड्यांच्या माध्यमातून ‘सही पोषण,देश रोशन’,बेटी बचाओ,बेटी पढाओ’,स्वच्छ जीवन,संपन्न जीवन’ अशा घोषणा देऊन गावातून प्रभातफेरी काढण्यात येऊन जनआंदोलन करण्यात आले.तसेच याच उपक्रमाच्या माध्यमातून जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा व सहा अंगणवाड्यांतील मुला-मुलींची आरोग्य तपासणी करण्यात आली.सदरील आरोग्य तपासणी मध्ये ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.आमीन तडवी,डॉ.परवीन तडवी,औषध निर्माण अधिकारी डॉ.विनोद बोदडे,आरोग्य सेविका रुपाली बाविस्कर यांचे सहकार्य लाभले.प्रसंगी श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्ताने दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम घेण्यात आला.यात लहान बालकांनी श्रीकृष्ण व राधा तसेच मावळणी यांची वेशभूषा परिधान करून आंनदोत्सव साजरा केला.सदरील कार्यक्रम यशस्वितेकरिता मुख्याध्यापक विजया पाटील,उपशिक्षक शेखर तडवी,शिक्षण सेवक हर्षाली बाऊस्कर,अंगणवाडी सेविका चारुलता झांबरे,रेखा बागुल,आशा आढाळे,सुनंदा राणे,स्वाती झांबरे,मीनाक्षी राणे,अंगणवाडी मदतनीस जरीना तडवी,उषाबाई तडवी,सीमा तडवी,नवसाबाई तडवी,पल्लवी सोनवणे,आशा तडवी यांनी परिश्रम घेतले.