डॉ सतीश भदाणे,पोलीस नायक
चोपडा तालुका (प्रतिनिधी) :-
शहरातील गांधी चौकात चोपडा शहर सामाजिक व सांस्कृतिक समितीच्या वतीने काल दि.७ सप्टेंबर गुरुवार रोजी आयोजित केलेली दहीहंडी शहरातील अरुण नगरमधील अरुण नगरचा राजा या गोविंदा पथकाने फोडली.
यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते सचिन पाटिल यांच्या वतीने रोख २१ हजार १११ रुपयांसह दहीहंडी चषक बक्षीस म्हणून देण्यात आले.यावेळी आयोजित कार्यक्रम प्रसंगी दहीहंडी उत्सव सन २०२३ वर्षाची दहीहंडी अरुण नगरचा राजा या गोविंद पथकाने पहिल्याच फेरीत चार थर लावत मानाची दहीहंडी फोडण्याचा मान मिळविला.सदरहू कृष्णा राजेंद्र नेवे या गोविंदाने ही दहीहंडी फोडली.प्रसंगी अरुण नगरचा राजा पथकाच्या वतीने एकच जल्लोष करत वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.पहिल्याच फेरीत तिसऱ्या गोविंदा पथकाने चार थर लावत हि दहीहंडी फोडण्याची किमया साधल्यामुळे या गोविंद पथकास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते सचिन पाटिल यांच्या वतीने रोख २१ हजार १११ रुपयांसह दहीहंडी चषक बक्षीस म्हणून देण्यात आले.यावेळी विशाल पाटिल,किशोर पाटील,विक्कि धोबी, आबा जोशी,मनोज पाटील,महेश पाटील,समाधान पाटील यांच्यासह अनेक सार्वजनिक मंडळांचे गोविंदा,शहरातील भाविक भक्त तसेच अरुण नगरचे सर्व मित्र मंडळ उपस्थित होते.