डॉ सतीश भदाणे,पोलीस नायक
चोपडा तालुका (प्रतिनिधी) :-
दि.९ सप्टेंबर २३ शनिवार
जालना जिल्ह्यात मराठा समाजातील आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ तालुक्यातील अडावद येथील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने काल दि.८ सप्टेंबर शुक्रवार रोजी सकाळी १० वाजता अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावरील अडावद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सब यार्डासमोर आंदोलकांनी घोषणांबाजीसह रास्ता रोको आंदोलन करून निषेध नोंदविण्यात आला.प्रसंगी रास्ता रोको आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची मोठी रिघ लागल्याची दिसून आली.
या रस्ता रोको आंदोलनात चोपडा साखर कारखाना संचालक दिनकर देशमुख,चंद्रकांत पाटील,हरिष पाटील,माजी सभापती डि.पी.साळुंके, राजेश देशमुख,लक्ष्मण पाटील,श्रीकांत दहाड,अनिल देशमुख,भुषण देशमुख,पप्पु मंगरुळकर,देविदास पाटील,पंकज देशमुख,वजाहतअली काझी,हाफीज मलक,किशोर देशमुख,शांताराम पवार,किशोर सोनवणे,नवल चव्हाण,सचिन महाजन,पंढरीनाथ पाटील,संजय देशमुख,शरद पाटील यांसह ग्रामस्थ,पदाधिकारी व मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रसंगी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता अडावद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश बुवा,पोउनि जगदिश कोळंबे,नासिर तडवी,सतिष भोई,मुकेश तडवी,विनोद धनगर, सुनिल तायडे,ज्ञानेश्वर सपकाळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला.