यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.९ सप्टेंबर २३ शनिवार
येथील पुर्व विभागाचे वनपरिश्रेत्र अधिकारी विक्रम पदमोर यांची शिंदखेडा (धुळे) येथे बदली झाल्याने त्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन नुकतेच करण्यात आले.चोपडा तसेच यावल वन विभागात विक्रम पदमोर यांनी मागील आठ वर्षापासून सेवा कार्य केले आहे.यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपवनसंरक्षक प्रथमेश हाडपे हे होते.
सदरील कार्यक्रमात बोलतांना विक्रम पदमोर यांनी नमूद केले की,ज्याप्रमाणे आपल्या देशाचे सैनिक सिमारेषेवर आपले जिव धोक्यात घालुन आपल्या देशाचे रक्षण करतात त्याचप्रमाणे आपण देखील आपला जिव ओतुन आपल्या निर्सग संपत्तीचे व वनजमिनीचे तसेच वन प्राण्यांचे जिवाभावाने व सदैव प्रामाणिक राहून रक्षण करणार असून वनविभागात प्रशासकीय सेवा करतांना संयमाने आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवुन कार्य केल्यास आपल्याला नावलौकिक मिळवणारी उत्कृष्ठ अशी प्रशासकीय सेवा आपणास करता येईल असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी उपवनसंरक्षक प्रथमेश हाडपे,यावल पुर्व विभागाचे प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे,पश्चिम विभागाचे वनपरिक्षेत्र
अधिकारी सुनिल भिलावे,चोपडा विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी भाईदास थोरात,फिरते पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आनंदा
पाटील,वन विभागाचे जेष्ठ सेवानिवृत्त कर्मचारी वाय.डी.पाटील यांच्या सह पुर्व आणी पश्चिम विभागाचे वनपाल व वन कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार वन कर्मचारी सुपडु सपकाळे यांनी मानले.